जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील गाव रस्ते मुख्य रस्त्यांना जोडणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ग्रामीण भागात रस्ते या दळणवळणाच्या धमन्या असून गावांना जोडणारे रस्ते जोपर्यंत मुख्य रस्त्याला जोडले जात नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार नाही.हि बाब ओळखून आपण रस्त्यांच्या कामास गती दिली असल्याचे प्रतिपादन कोकमठाण येथील एका कार्यक्रमात आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

“कोकमठाण गावाला ऐतिहासिक,पौराणिक वारसा असून कोकमठाणमध्ये श्री संत जनार्दन स्वामी आश्रम,जंगलीदास महाराज आश्रम तसेच कोकमठाण व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले लक्ष्मीआई माता जागृत देवस्थान आहे.या देवस्थानाकडे आजवर कुणीही लक्ष दिले नाही त्यामुळे हे देवस्थान विकासापासून वंचित होते”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे विविध योजनांअंतर्गत कोकमठाण गाव ते माळवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण,श्री लक्ष्मीमाता देवस्थान परिसर सुशोभीकरण तसेच राजेंद्र देशमुख यांच्या वस्तीकडे जाणारे सी.डी.वर्क करणे व धोत्रे येथे २६.२५ लक्ष निधीतून बांधण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ३ शाळा खोल्यांचे भूमिपूजन आदी विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या सोनाली साबळे होत्या.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक बाळासाहेब बारहाते, जि.प.सदस्य राजेश परजणे,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,पं.स.सदस्य मधुकर टेके
गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,अभियंता उत्तमराव पवार,शाखा अभियंता गुंजाळ आदींसह
ग्रामस्थ उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”कोकमठाण परिसरातील २०१९ च्या विधानसभा सभा निवडणुकीपूर्वी प्रलंबित असलेली विकासकामे निवडणुकीनंतर दोनच वर्षात बहुतांशी पूर्ण करण्यात यश मिळाले असून पुढील काळात हि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत करू.कोकमठाण गावाला ऐतिहासिक,पौराणिक वारसा असून कोकमठाणमध्ये श्री संत जनार्दन स्वामी आश्रम,जंगलीदास महाराज आश्रम तसेच कोकमठाण व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले लक्ष्मीआई माता जागृत देवस्थान आहे.या देवस्थानाकडे आजवर कुणीही लक्ष दिले नाही त्यामुळे हे देवस्थान विकासापासून वंचित होते.मात्र जि.प.मध्ये सत्तांतर झाल्यामुळे लक्ष्मीआई माता देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिल्यामुळे या देवस्थानचा विकास करणे शक्य झाले आहे व यापुढे देखील कोकमठाण व परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ.काळे यांनी शेवटी दिली आहे.
कार्यक्रमास उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close