कोपरगाव तालुका
समता विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचा मोठा वाटा-कौतुक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय पातळीवरील परीक्षामध्ये समताचे विद्यार्थी चांगले यश मिळवून देत असून या यशात समताच्या विद्यार्थ्यांबरोबर समताच्या शिक्षकांचा देखील सिंहाचा वाटा असून ते कौतुकास पात्र आहे.असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी एका कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून काढले आहे.
“लॉकडाउन हा माझ्यासाठी आपत्ती नसून इष्टापत्ती ठरली कारण आहे.व आपल्याला समतातील शिक्षकांचा पूर्ण वेळ मिळाला आणि मला अभ्यासविषयक येणाऱ्या अडचणी बाबत कोणत्याही प्रकारची वेळेची मर्यादा न ठेवता मदत केली आहे”-विश्वजित पाटील,समताचा यशस्वी विद्यार्थी.
समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी विश्वजीत पाटील याने २०२०-२१ च्या नीट परीक्षेत ७२० गुणांपैकी ६७९ गुण मिळवत ऑल इंडिया रँकमध्ये ९९९ वा तर जातनिहाय संवर्गातील ओबीसी प्रकारात २४३ वा क्रमांक मिळवला असून भारतातील सुप्रसिद्ध एम्स (AllMS) या वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे तर राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या जेईई परीक्षेत अथर्व परदेशी याने यश संपादन केले असून या परीक्षेत ९७.६३ टक्केवारी मिळाली आहे. तर महाराष्ट्रातील सीईटी परीक्षेत ९९ टक्के गुण प्राप्त झाले आहे.या पार्श्वभूमीवर त्यांचा नुकताच सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी स्कूलच्या विश्वस्त स्वाती कोयटे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन,पालक राजाराम पाटील,रोहिणी राजाराम पाटील,संजय परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्यांना समता पॅटर्न नुसार मार्गदर्शन करणाऱ्या कोटा येथील शिक्षक हेमंत सुमन,राहुल गुप्ता,चेतन शर्मा,जोगेंद्र राजपूत आदींचा सत्कार करण्यात आला आहे.
तर अथर्व परदेशी म्हणाले की,”आपण ग्रामीण भागातील असून मला समता स्कूलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे मला या यशात स्कूलच्या शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन आणि उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिल्पा वर्मा यांनी तर आभार उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले आहे.