कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी खुशीत!
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील दोन वर्ष कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगातच भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे मागील दोन वर्ष कोणतेही सण,उत्सव आनंदात आणि एकत्र येवून साजरे करता आले नव्हते मात्र यावर्षी कोरोनावर मात केली असून यात आरोग्य विभागाचा मोठा वाटा असून यावर्षी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रिम,महागाई भत्ता,व ओक्टपबर महिन्याचा पगार आदी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी खुशीत जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेने दिली आहे.याबाबत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
“या दिवाळी उत्सवाला कर्मचाहऱ्यांना आनंद मिळावा यासाठी खबरदारी घेतली आहे.व त्यानुसार दिवाळी सण अग्रिम,कोविड काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा,५ टक्के महागाई भत्ता (जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९) फरक,माहे ऑक्टोबर महिन्याचा पगार आदी देण्याचा निर्णय घेतला आहे.कर्मचारी अधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.
गत दोन वर्षांपासून कोरोना साथीचा अतिरिक्त ताण नगरपरिषद प्रशासनावर आला होता.तरी हे शिवधनुष्य सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पेलले होते.त्याचा पालिका पदाधिकारी व अधिअकारी यांना सार्थ अभिमान आहे.त्यामुळे या आनंदाच्या क्षणी त्यांच्या पाठीशी उभे राहाणे कर्तव्य आहे असे समजून हा अग्रिम देण्यात आला आहे.
कोपरगाव नगराध्यक्ष विजय वहाडणे व नव्याने दाखल झालेले मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार हा वेळेत मिळावा यासाठी खबरदारी घेतली आहे.म्हणूनच या दिवाळी उत्सवाला कर्मचाहऱ्यांना आनंद मिळावा यासाठी खबरदारी घेतली आहे.व त्यानुसार दिवाळी सण अग्रिम,कोविड काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा, ५ टक्के महागाई भत्ता (जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९) फरक,माहे ऑक्टोबर महिन्याचा पगार आदी देण्याचा निर्णय घेतला आहे.कर्मचारी अधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे कोपरगाव नगरपरिषद येथे रुजू झाल्यापासून त्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन हे महिन्याच्या एक तारखेला कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावेत या अनुषंगाने आस्थापना विभाग,लेखा विभाग यांना सूचना करून मार्गदर्शन केले आहे.त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचारी अधिकारी यांचा पगार दरमहा १ तारखेस त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचारी अधिकारी यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्व कर्मचारी अधिकारी यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे आभार व्यक्त केले आहे.