कोपरगाव तालुका
संताच्या शिकवणीमुळेच समाजात ऐक्य टिकून – संत विवेकानंद महाराज
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संतांचे कार्य निस्वार्थी भावनेने असते. समाजाचा उद्धार व उत्कर्ष व्हावा म्हणून संत आपले जीवन समर्पित करतात. संतांनी नेहमीच समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले आहे. सत्कर्म, दिनदलितांची सेवा, निसर्गविषयी कृतज्ञता, प्रामाणिकपणा हिच शिकवण सर्व संत समाजाला वर्षानुवर्ष देत आहेत म्हणूनच समाजात ऐक्य टिकून आहे असे प्रतिपादन आत्मा मालिक ध्यानपीठाचे ज्येष्ठ संत विवेकानंद महाराज यांनी केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतांच्या नाशिक विभाग आयोजित संत संम्मेलनाच्या अभ्यास वर्गात बोलत होते.
प्रत्येक संतांनी आपल्या प्रवचनात गोरक्षण, स्वदेशीचा वापर, युवकांची व्यसनाधीनता यांवर प्रबोधन केले पाहिजे. सध्या जागतिक तापमानाची वाढ सर्वात मोठी समस्या होत आहे. यासाठी ‘एकच लक्ष देशी वृक्ष’ या उपक्रमांअतर्गत वृक्षारोपणाची मोहिम हाती घेतली आहे. पंढरपूर ला लहानमोठया १४० पालख्या येत असतात. या पालख्यांच्या मार्गावर वृक्षारोपन करण्याचे काम सुरू केले आहे-मोरे महाराज
या संत संमेलनाचे उद्घाटन संत विवेकानंद महाराज व संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज यांचे हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी व्यासपीठावर आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, नाशिक प्रांत प्रमुख प्रफुल्ल जोशी, संघचालक कैलास साळुंके, प्रांत प्रचारक संपर्क प्रमुख रविंद्र मुळे, प्रांत कार्यवाहक पुणे विनायक थोरात, मालेगाव जिल्हा संत संपर्क प्रमुख राजेंद्र सारंगे, आबा मुळे, आश्रमाचे व्यवस्थापक हिरामण कोल्हे, जनसंपर्क अधिकारी योगेश गायके, भगवान ढगे आदि मान्यवर उपस्थित होते.
या एकदिवसीय संत संम्मेलन अभ्यास वर्गात प्रत्येक जिल्हयातून ३२ संतांना निमंत्रित करण्यात आले होते. असे एकूण १५० संतांनी या अभ्यास वर्गात सहभाग घेतला. हे संमेलन २२ डिसेंबर रोजी आत्मा मालिक ध्यानपीठात संपन्न झाले.
या अभ्यास वर्गात बोलताना ह.भ.प. मोरे महाराज म्हटले की, प्रत्येक संतांनी आपल्या प्रवचनात गोरक्षण, स्वदेशीचा वापर, युवकांची व्यसनाधीनता यांवर प्रबोधन केले पाहिजे. सध्या जागतिक तापमानाची वाढ सर्वात मोठी समस्या होत आहे. यासाठी ‘एकच लक्ष देशी वृक्ष’ या उपक्रमांअतर्गत वृक्षारोपणाची मोहिम हाती घेतली आहे. पंढरपूर ला लहानमोठया १४० पालख्या येत असतात. या पालख्यांच्या मार्गावर वृक्षारोपन करण्याचे काम सुरू केलेले आहे. या उपक्रमांर्गत पहिला प्रयोग मंगळवेढा ते पंढरपूर या पालखी मार्गावर वृक्षारोपनाचे ६० टक्के काम पूर्ण झालेले असून या झाडांना नियमितपणे खतपाणी घालण्याचे काम पंढरपूर ट्रस्टमार्फत चालू आहे. पंढरपूर वारी बरोबरच ही वारी हरितवारी होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. तसेच सोलापूर विद्यापीठ, सामाजिक वनीकरण विभाग व पंढरपूर ट्रस्टच्या मदतीने वृक्ष लागवडीचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे काम चालू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत कार्य करणा-या संतांचे सामाजिक कार्याशी संपर्क प्रस्थापित करणे, संघाने सुरू केलेल्या कामे उदारणार्थ व्यसनमुक्ती, कुटुंब प्रबोधन, ग्रामविकास गौसेवा, सामाजिक समरसता ही समाजापर्यंत पोहचवून सामाजिक परिवर्तन करणे या उद्देशाने या संत अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे संतसंपर्क प्रमुख राजेंद्र सारंगे यांनी सांगितले. प.पू. आत्मा मालिक माउलींच्या सानिध्याने पावन भूमीत हे संत संमेलन घेण्याची संधी मिळाली याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.