कोपरगाव तालुका
कोपरगावात परतीच्या पावसाच्या सरी,सोयाबीन हातातून जाणार !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
यंदाच्या मोसमात पावसानंआपलं रौद्र रुप दाखवलं आहे.अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून आता जाता जाता देखील पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे केले आहेत.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगावात आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी आल्या असून यात जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत उमेश धुमाळ यांच्या सोयाबीन पिकाचे शेततळ्यात रूपांतर झाल्याचे समजले आहे.त्यामुळे इतरत्रही हीच स्थिती असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या पीकाचं मोठं नुकसान झाल आहे.उत्तर नगर जिल्ह्यातही याचा फटका बसला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती वाटू लागली आहे.या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी येथील शेतकरी उमेश धुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.
परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.या परतीच्या पावसानं बुलढाणा,वाशिम,परभणी,हिंगोलीसह राज्यातल्या अनेत ठिकाणी उभ्या पीकाचं नुकसान केलंय.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं,आज आणि उद्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.हिंगोलीत कयाधू नदीला पूर आला आहे.
बुलढाण्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसतोय.अनेक ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या पीकाचं मोठं नुकसान झाल आहे.उत्तर नगर जिल्ह्यातही याचा फटका बसला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती वाटू लागली आहे.या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी येथील शेतकरी उमेश धुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.