कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडीची कार्यकारिणी जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडीची कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी कारवाडीचे प्रशांत खडतकर तर सचिव पदी पोहेगांव येथिल देविदास झाल्टे यांची नियुक्ती झाली आहे नूतन पदाधिकऱ्यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ व कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचा मेळावा कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय,कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ही निवड जाहीर झाली आहे.
या मेळाव्याला माध्यमिक शिक्षक संघ कोपरगाव तालुकाध्यक्ष विलास वाकचौरे,सचिव नरेंद्र ठाकरे,टीडीएफ मावळते तालुकाध्यक्ष कर्णासाहेब शिंदे,सचिव कैलास थोरात,तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश बोळीज,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष गजानन शेटे,साहेबराव गायकवाड,भास्कर बांगर,काशिनाथ लव्हाटे,दिलीप डहाळे,राहाता टीडीएफचे नुतन उपाध्यक्ष सुरेश वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले.
कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)ची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली ती पुढील प्रमाणे जाहिर करण्यात आली.
तालुका अध्यक्ष म्हणून प्रशांत खडतकर
उपाध्यक्ष शिवाजी जुंधारे व कुलदीप गोसावी
सचिव देविदास झाल्टे,
सहकार्यवाहक ललित जगताप व गोविंद गोरे
खजिनदार राहुल गिते
या सर्वाच्या निवडी एकमताने करण्यात आल्या.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा प्रतिनिधी रामदास गायकवाड व अनिल अमृतकर,ए.जे.कोताडे यांनी परिश्रम घेतले.नवनिर्वाचित कार्यकारिणीचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.आभार माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव नरेंद्र ठाकरे तर कार्यक्रम सुत्रसंचलन रामदास गायकवाड यांनी केले.या मेळाव्याला तालुक्यातुन बहुसंख्य शिक्षक कोरोनाचे नियम पाळुन उपस्थित होते.