कोपरगाव तालुका
कोपरगाव बंदला व्यापाऱ्यांचा नकार,अखेर काळ्या फितीवर समाधान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला होता.लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.मात्र सणासुदीचे दिवस कोरोनाचे संकट याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी त्यास नकार दिल्याने अखेर कोपरगाव बंदची तहान महाविकास आघाडीला काळ्या फिती लावण्याची मिनतवारी करून ताकावर भागवावी लागली असल्याचे चित्र दिसून आले आहे.
“आमचा या बंदला विरोधही नव्हता व होकारही नव्हता.मात्र कायम बंदला किरकोळ व्यापारीच बळी का ? मोठे उद्योजक,संघ हे हा बंद का पाळत नाहीत ? असा आमचा रास्त सवाल होता.त्याला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने होकार दिला व आम्ही काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला.त्या निर्णयाची आ.आशुतोष काळे व त्यांच्या मित्र पक्षांनी जी व्यथा समजून घेतली त्या बद्दल त्यांना धन्यवाद”-सुधीर डागा.महासचिव,कोपरगाव व्यापारी महासंघ.
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.त्या नुसार आज महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं होत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली होती.त्यात मेडिकल स्टोअर्स,दूध पुरवठा,रुग्णालये,राज्य परिवहन आगराच्या बससेवा इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नव्हते.मात्र याला कोपरगाव मनसेचा पाठिंबा नव्हता हे विशेष !
कोपरगावात राष्ट्रवादीला मानणारा मोठा व्यापारी वर्ग असून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला याबाबत बंद करण्यास चक्क नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे शहरातील व तालुक्यातील बहुतांशी दुकाने सुरु असलेली दिसून आली आहे.दरम्यान कोपरगाव बस स्थानकात एका बसला एक गांधीनगर येथील गणेश जाधव या वैफल्यग्रस्त नागरिकाने दगड मारण्याची अपवादात्मक घटना घडली असून हा अपवाद वगळता हा बंद कोणतीही अनुचित घटना न होता पार पडला आहे.त्याने या पूर्वीही कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांत खिडकीच्या काचेवर असा दगड मारण्याचा प्रपात केला होता.त्यामुळे याचा आंदोलनाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बाबत कोपरगाव येथील शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वरील व्यापाऱ्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.व “सोमवार हा आठवडे बाजारांचा दिवस असतो व त्या दिवशी आठवड्याचा व्यवसाय होतो.आधीच कोरोना विषाणूच्या साथीने व प्रतापाने व्यापारी जेरीस आले आहे.त्यामुळे त्यांनी अशी मागणी केली होती.याला दुजोरा दिला आहे.व त्यामुळे सर्व मित्र पक्षाच्या संमतीने हा बंदचा निर्णय हा काळ्या फिती लसूण निषेध व्यक्त करण्यात रूपांतरित केला असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान या बंदला अखेर आघाडीच्या मित्र पक्षांच्या नेत्यांनी अखेर व्यापाऱ्यांना काळ्या फिती लावण्याची विनंती केली होती.त्यानुसार काही व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावल्या असल्याचे दिसून आले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,शिवसेना आदी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव येथील तहसीलच्या नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.
या बाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विनंती केली होती.व त्यास महाआघाडीच्या मित्र पक्षांनी दुजोरा देऊन नंतर पाठिंबा दिला होता.त्यांमुळे काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता” असे सांगितले असून व्यापाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतला याला दुजोरा दिला आहे.त्यामुळे आता वरिष्ठ नेते याबाबत काय भूमिका घेतात या कडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संदीप वर्पे,सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,कोपरगाव नगरपरिषदेचे गटनेते विरेन बोरावके,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,शिवसेना शहराध्यक्ष कलवींदर दडियाल,काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,मंदार पहाडे,सुनील शिलेदार,राजेंद्र वाकचौरे,भरत मोरे,प्रफुल्ल शिंगाडे,फकीर कुरेशी,दिनकर खरे,डॉ.तुषार गलांडे,वाल्मीक लहिरे,सुनील तिवारी,अस्लम शेख आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.