जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद,शेतकरी हैराण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोसळत असलेल्या पावसाने कहर केला असून त्याला कोपरगाव शहर व तालुका हि अपवाद नाही काल दिवसभरात झालेल्या पावसाची नोंद जेऊर कुंभारी येथील पर्जन्य मापकावर घेण्यात आली असून हि नोंद रवंदे मंडळात सर्वाधिक ६१ मी.मी.नोंदवली गेली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असल्याच्या बातम्या आहेत.

कोपरगाव तालुक्यातील महसूल मंडळातील सर्वाधिक पाऊस रवंदे मंडळात ६३ मी.मी.तर कोपरगाव मंडळात तो ६१ मी.मी.तर त्या खालोखाल सुरेगाव मंडळात ६०,पोहेगाव मंडळ ५७,दहिगाव मंडळात ५४ मी.मी.नोंदवला गेला आहे. दरम्यान भंडारदऱ्यातून ५५४०,निळवंडे ७१३३,ओझर उंचवनी बंधाऱ्यातून ४५४३ तर मुळा धरणातून ३२५५ क्युसेकने पाणी विसर्ग सोडण्यात आला आहे.दरम्यान तालुक्यातील पावसाचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला आ.काळे यांनी दिल्या असल्याच्या बातम्या आहेत.

हवामान विभागाकडून राज्यातील सात जिल्ह्यांना रेड तर नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे.सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर,नांदेड,लातूर आणि उस्मानाबादेत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात आजसाठी चारही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे ह्या जिल्ह्यात काही ठिकाणी २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ह्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही या पावसाचा फटका बसला असून त्यात कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर आदी तालुक्यात सोयाबीन पिकास मोठी किंमत चुकवावी लागली आहे.ब्राम्हणगाव परिसरात अनेक घरात पाणी घुसले आहे.कोपरगाव तालुक्यातील महसूल मंडळातील सर्वाधिक पाऊस रवंदे मंडळात ६३ मी.मी.तर कोपरगाव मंडळात तो ६१ मी.मी.तर त्या खालोखाल सुरेगाव मंडळात ६०,पोहेगाव मंडळ ५७,दहिगाव मंडळात ५४ मी.मी.नोंदवला गेला आहे. दरम्यान भंडारदऱ्यातून ५५४०,निळवंडे ७१३३,ओझर उंचवनी बंधाऱ्यातून ४५४३ तर मुळा धरणातून ३२५५ क्युसेकने पाणी विसर्ग सोडण्यात आला आहे.व नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान दि.२९ सप्टेंबर रोजी ११ वाजता जायकवाडीचे सर्व गेट टप्प्या टप्प्याने अर्धाफूट उघडून एकूण ९४३२ क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी अधिक होऊ शकतो. आज सकाळी या धरणातकालपासुन ६५ हजार क्युसेकने नवीन पाणी दाखल होत आहे . धरणात प्रकल्पीय उपयुक्त साठा ७१ टी. एम. सी. झाला आहे. तर मृत सह एकूण साठा ९७ टी. एम. सी. इतका झाला आहे. एकुण पाण्याची टक्केवारी ९५ टक्के असुन जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ९२ टक्के आहे. या धरणाची उपयुक्त साठ्याची एकुण क्षमता ७६ तर मृत सह एकूण क्षमता १०२ टी.एम.सी. इतकी आहे.

या खेरीज नाशिकची तहान भागवणारं गंगापूर शहर शंभर टक्के भरलं आहे.त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठा विसर्ग करण्यात येणार आहे. जवळपास १५ हजार क्यूसेकपेक्षा जास्त वेगानं हा विसर्ग होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा दिला जात आहे.गोदावरीतही पाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close