जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

‘बुलेट ट्रेन’मुळे सामाजिक व पर्यावरणीय हानी होणार नाही याची दक्षता-हमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

“प्रस्तावित ‘मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन’ च्या कामामुळे कोपरगांव परिसरातील एकाही शेतकऱ्यांची सामाजिक व पर्यावरणीय हानी होणार नाही.याची शासनाच्या वतीने काटेकोरपणे दक्षता घेण्यात येईल.”असे आश्वासन कोपरगांवचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शिर्डी येथे बोलताना दिली आहे.

“बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी या परिसरातील हवा,ध्वनी,पाणी व जमीन या पर्यावरणीय व इतर सामाजिक घटकांचा सूक्ष्म अभ्यास करण्यात येईल.कुठेही झाडांची कत्तल होणार नाही.याची दक्षता घेण्यात येईल”प्राजक्ता कुलकर्णी,पर्यावरण मूल्यांकन अभ्यासक.

नवी दिल्ली येथील नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन’ समृद्धी महामार्गाला समांतर उभारण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे.अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले,निवासी जिल्हाधिकारी संदिप निचित, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली या रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरण व सामाजिक विचारांसाठी सार्वजनिक सल्ला बैठक कोपरगाव येथे तहसील कार्यालयात शुक्रवार दि. १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगांव गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचआरसीएल) चे पथक प्रमुख राहूल रंजन, सहाय्यक समाज विकास अधिकारी श्याम चौगुले,पर्यावरण मूल्यांकन अभ्यासक प्राजक्ता कुलकर्णी,प्रदीप बर्गे आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले,की,”सदर प्रकल्पामध्ये पर्यावरण,जैव विविधता,ग्रामसभेच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या भावना व गरजांचा संवेदनशीलपणे विचार करण्यात आला आहे.
त्या वेळी प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या की,”बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी या परिसरातील हवा,ध्वनी,पाणी व जमीन या पर्यावरणीय व इतर सामाजिक घटकांचा सूक्ष्म अभ्यास करण्यात येईल.कुठेही झाडांची कत्तल होणार नाही.याची दक्षता घेण्यात येईल.याप्रसंगी बुलेट ट्रेन संदर्भात चित्रफित व्दारे संभाव्य नियोजन संदर्भात माहिती देण्यात आली.या सभेला कोपरगाव तालुक्यातील धोत्रे,भोजडे,कान्हेगान,संवत्सर,कोकमठाण,जेऊर कुंभारी,डाऊच खुर्द,चांदे कसारे,पोहेगांव खुर्द,घारी,देडे कोऱ्हाळे या ११ गावांचे सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले आहे.

प्रस्तावित ‘मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन’ प्रकल्पाबाबत माहिती

केंद्राच्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनतर्फे देशातील मेट्रो शहरांना बुलेट ट्रेनने जोडण्यात येणाऱ्या प्रस्तावित ८ बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रकल्पात ‘नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन’चा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे,नाशिक,अहमदनगर,औरंगाबाद,जालना,बुलढाणा,वाशिम,अमरावती,वर्धा व नागपूर या ११ जिल्ह्यातून ही बुलेट ट्रेन धावणार आहे.समृद्धी महामार्गाला समांतर असा हा बुलेट ट्रेन मार्ग आहे.मुंबई-नागपूर दरम्यान ७३९ किलोमीटरचा हाईस्पीड कॅरिडॉर आहे.यामुळे मुंबई-नागपूर अंतर अवद्या साडेतीन तासात कापले जाणार आहे.यात ११ जिल्ह्यातील १२४५.६१ हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. यात कोपरगांव तालुक्यातील ११ गावांची ५१.५० हेक्टर जमीन संपादीत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close