निवडणूक
कोपरगाव तालुक्यातील…या सेवा संस्थेत परिवर्तन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या गणल्या जाणाऱ्या देर्डे-चांदवड सेवा संस्थेची निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून या निवडणुकीत कोल्हे गटाला सपाटून मार बसला आहे व यात आ.काळे गटाला सत्तेशी संधी मिळाली आहे.नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देर्डे-चांदवड सेवा संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे कोल्हे भाऊसाहेब पुंजाजी,शितोळे दादासाहेब शुक्लेश्वर,होन शिवाजी चंद्रराव,गुंड सतीश पोपटराव,कोल्हे बबन दगडू,होन ज्ञानदेव बाजीराव,होन भाऊसाहेब सखाराम,कोल्हे प्रभाकर भास्करराव,विघे विष्णुपंत रंगनाथ,कोल्हे मनीषा सुभाष,कोल्हे सुनिता संजय मेहेत्रे सचिन शांताराम आदींचा त्यात समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे-चांदवड विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाचे सर्वच्या सर्व १२ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे.या निवडणुकीपूर्वी देखील काळे गटाचा एक सदस्य बिनविरोध निवडून आला होता.त्यामुळे सर्वच्या सर्व १३ जागा काळे गटाने जिंकल्या आहेत.कोल्हे गटाचे सर्व उमेदवार पराभूत होवून कोल्हे गटाने या सोसायटीची सत्ता गमविली आहे.
यामध्ये काळे गटाचे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे कोल्हे भाऊसाहेब पुंजाजी,शितोळे दादासाहेब शुक्लेश्वर,होन शिवाजी चंद्रराव,गुंड सतीश पोपटराव,कोल्हे बबन दगडू,होन ज्ञानदेव बाजीराव,होन भाऊसाहेब सखाराम,कोल्हे प्रभाकर भास्करराव,विघे विष्णुपंत रंगनाथ,कोल्हे मनीषा सुभाष,कोल्हे सुनिता संजय मेहेत्रे सचिन शांताराम आदींचा त्यात समावेश आहे.
निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे व निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.