कोपरगाव तालुका
अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरण,कोपरगावात पालिका संघटनेचे कामबंद आंदोलन सुरु
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
कोपरगाव नगर परिषदेत काल दि.२२ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील पूनम चित्रपट गृहासमोरील आरोपींचे अवैध टपरीचे अतिक्रमण रात्रीच्या सुमारास नगरपरिषदेने काढल्याचा राग मनांत धरून शिवनेनेचे माजी शहराध्यक्ष सनी रमेश वाघ,माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक योगेश बागुल,उपजिल्हा प्रमुख कैलास द्वारकानाथ जाधव,बालाजी पंढरीनाथ गोर्डे,साई पंढरीनाथ गोर्डे,निलेश पंढरीनाथ गोर्डे,आशिष शेळके आदीनीं बेकायदा जमाव करून कोपरगाव नगरपरिषदेत जाऊन अधिकाऱ्यांना मारहाण,शिवीगाळ करून कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केल्या प्रकरणी आज सकाळी कोपरगाव नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली असून त्यामुळे पालिकेचे अत्यावश्यक सेवेसह सर्वच काम ठप्प झालेले आढळले आहे.त्यामुळे ऐन पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उपमुख्याधिकारी व फिर्यादी सुनील गोर्डे हे अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व लष्करातून देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत.त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा या अधिकारी कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.त्यामुळे आज आमच्या प्रतिनिधीने नगरपरिषद कार्यालयात फेरफटका मारला असता शुकशुकाट दिसून आला आहे.याचा पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिकूल परिमाण होणार आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेने आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे आदेशाने मार्च २०१० मध्ये शहरातील सुमारे २ हजाराहून अधिक अवैध व्यावसायिकांची अतिक्रमणे हटवली होती.त्यानंतर गत दहा वर्षाहून अधिक काळ या प्रश्नावर विविध पक्षांचे शहरातील मतपेटीचे राजकारण सुरु आहे.ते अद्याप संपण्याची चिन्हे नाही.उलट याला नगरपरिषद निवडणूक जवळ आली की मतांची बेरीज-वजाबाकी सुरु होते.व त्या दिशेने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु होतात.याशिवाय नेहमीच येतो पावसाळा या धर्तीवर अतिक्रमण करणाऱ्यानांही उत येतो. हे अतिक्रमण सुरु झाल्यावर सर्वच राजकीय पक्ष त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात व आपल्या मतांच्या लाचारीपोटी शहराचा उकिरडा करून टाकतात.असेच वर्तमानात सुरु आहे.येवला रोड.धारणगाव रोड आदीसह अनेक ठिकाणी याचा उत्पात पाहायला मिळतो.सन २०१० साली अतिक्रमण काढल्यावर बऱ्याच जणांनी आपल्या पथाऱ्या पुन्हा पसरल्या आहेत.तर अनेक नगरसेवक त्या अतिक्रमण धारकांचे अधिकाऱ्यांकडून संरक्षण करण्यासाठी मासिक हप्ते गोळा करतात.हे कोपरगाव शहरातील सार्वत्रिक चित्र आहे.अशीच घटना दि.२२ जुलै २०२१ रोजी घडली असून कोपरगाव नगरपरिषदेने पूनम चित्रपट गृहासमोरील अतिक्रमण काढलेले असताना त्याच ठिकाणी वरील काही आरोपीनी पुन्हा त्याच ठिकाणी आपले दुकान मांडण्याचा प्रयत्न केला असता.त्याला नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हरकत घेतली व त्या विरोधात कारवाई करून ते अतिक्रमण रात्रीच्या सुमारास मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या आदेशाने काढून टाकले होते.त्याचा राग मनात धरून वरील आरोपीनी आज नगरपरिषदेत सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जाऊन तेथील उपमुख्याधिकारी व शहर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ तर काहींना मारहाण केली तर तेथील किंमती साहित्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली आहे.या प्रकरणी फिर्यादी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी या प्रकरणी वरील सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर आज या आरोपीना न्यायालयाने एक दिसवांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर दुसरीकडॆ या आरोपीविरुद्ध पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने कामबंदचे हत्यार उपसले आहे.त्यामुळे आज सकाळी काही ठिकाणी आरोग्य विभागाची स्वच्छता होताना दिसली मात्र त्या नंतर कामाच्या वेळे आधी दहा वाजेच्या दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांची बैठक होऊन त्यांनी पालिकेचे कामबंद आंदोलन सुरु केले आहे.फिर्यादी सुनील गोर्डे हे अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व लष्करातून देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत.त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा या अधिकारी कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.त्यामुळे आज आमच्या प्रतिनिधीने नगरपरिषद कार्यालयात फेरफटका मारला असता शुकशुकाट दिसून आला आहे.याचा पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिकूल परिमाण होणार आहे.आधीच या पालिकेत गलिच्छ राजकारणाने कोणी यायला तयार होताना दिसत नाही या घटनेने पुन्हा पालिका राज्यात बदनाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.