जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात नांदूर मधमेश्वर जलद कालव्यांच्या उपचाऱ्यांचे भूसंपादन धनादेश प्रदान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मराठवाड्यातील वैजापूर,गंगापूर तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या मराठवाडा जलद कालव्यांच्या उपचाऱ्यांसाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते धनादेश सतरा वर्षानंतर प्रदान करण्यात आले आहे.प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या भाजपचे माजी सरचिटणीस असलेले राजेंद्र खिलारी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.”त्यांचा राजकीय अभ्यास असून पाणी याविषयावर ते अधिकारवाणीने बोलतात.त्यांनी जनसंघापासून ते भाजपपर्यंत केलेले काम लक्षवेधी आहे.त्यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवास नक्की दखलपात्र असून त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल”आ.आशुतोष काळे

मराठवाडा जलद कालवा सुरु होऊन जवळपास सतरा वर्षांचा कालखंड उलटला आहे.मात्र या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या लाखमोल जमिनी दिल्या त्यांना अद्याप भूसंपादनाची रक्कम अद्याप मिळाला नव्हता.त्या बाबत या प्रश्नाकडे या भागातील जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र खिलारी यांनी आ.आशुतोष काळे यांचे लक्ष वेधून घेतले होते.त्याची दखल आ.काळे यांनी गांभीर्याने घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकल्प बधितांचा सुमारे ०८.४० कोटी पैकी ६१ लाख ८७ हजार १७१ रुपयांचा भूसंपादन मोबदला त्वरित देण्याचे आदेश दिले होते.त्या बाबत धनादेश तयार करण्यात आले होते.त्यांचे प्रदान नुकतेच आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकराव काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक बाळासाहेब बारहाते,कोपरगाव जिनिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर,लौकीचे माजी सरपंच अजिनाथ खटकाळे,रामभाऊ खटकाळे,बबनराव भवर,विजय भवर,दिगंबर जाधव,रमेश खटकाळे,आदी मान्यवरांसह नांदूर मध्यमेश्वर कालव्याचे बाळासाहेब वारकर,भूमी अभिलेख विभागाचे संजय भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मराठवाडा जलद प्रकल्प कालव्यांचे काम पूर्ण होऊन सतरा वर्हाहून अधिक कालखण्ड उलटला आहे.तरीही अद्याप या शेतकऱ्यांना। न्याय मिळालं नाही हा विरोधाभास नक्कीच मन विषन्न करणारा आहे.मात्र आपण त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याचाह प्रयत्न केला आहे.या खेरीज खोपडी,व पूर्व भागातील अन्य गावांचे प्रस्ताव दाखल करावे असे सांगून त्यांनी नुकताच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या राजेंद्र खिलारी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.त्यांचा राजकीय अभ्यास असून पाणी याविषयावर ते अधिकारवाणीने बोलतात.त्यांनी जनसंघापासून ते भाजपपर्यंत केलेले काम लक्षवेधी आहे.त्यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवास नक्की दखलपात्र असून त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल असे आश्वासित केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक चारुदत्त शिनगर यांनी केले तर उपस्थितांचे आभार गोरक्षनाथ जामदार यांनी मानले आहे.त्या वेळी राजेंद्र खिलारी यांनी कामचुकार अधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढले आहे.सदर प्रसंगी आ.काळे यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना धनादेश प्रदान केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close