कोपरगाव तालुका
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा- परजणे यांची सरकारकडे मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगांव-( प्रतिनिधी )
राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या निवेदनातून श्री परजणे यांनी कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांच्या सद्याच्या परिस्थितीसंदर्भात माहिती कळविली आहे.
कोपरगांव ते रांजणगांव देशमुख,कोपरगांव ते संवत्सर – कान्हेगांव – वारी, कोपरगांव ते पढेगांव – उक्कडगांव, कोपरगांव ते कोळपेवाडी, कोपरगांव ते पुणतांबा आदी प्रमुख रस्ते तालुक्याच्या दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे असून वैजापूर, संगमनेर, येवला, श्रीरामपूर, सिन्नर या तालुक्यांना जोडणारे हे रस्ते आहेत. या रस्त्यांवरुन रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. परंतु खड्ड्यांमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तर अनेकांना अपंगत्व आलेले आहे. रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे तालुक्यातील अनेक गांवातील बसेस बंद झाल्याने शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसेस सुरु करण्यासंदर्भात बस आगाराकडे मागणी केली असता, आधी रस्ते व्यवस्थित करा, मग बसेस सुरु करता येतील असे उत्तर ऐकायला मिळते. पावसामुळे तर बहुतांशी रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत चिखल झाल्याने चार चाकी वाहने तर सोडाच परंतु दुचाकी वाहने, सायकली देखील चालविता येत नाहीत. पायी चालणेही मस्कील झालेले आहे. दुध उत्पादक शेतकरी, आजारी रुग्ण, व्यापारी यांना अनेक संकटांना तोड देण्याची वेळ आलेली आहे. लोक या परिस्थितीला पूर्णपणे वैतागले आहेत. रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केल्याचे सरकार सांगते मग कोपरगांव तालुक्यात रस्त्यांची अवस्था इतकी बिकट का ? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची गरज आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी या गंभिर प्रश्नात जातीने लक्ष पुरवून कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे तात्पुरत्या स्वरुपात न बुजविता कायमस्वरुपी बुजविण्यासंदर्भात संबंधित विभागास निर्देश करावेत अशीही मागणी श्री परजणे यांनी केली असून येत्या दहा – पंधरा दिवसात खड्डे बुजविले नाहीत तर तालुक्यातील जनतेला वेगळा पावित्रा घेवून तीव्र स्वरुपाचे आंदोलन हाती घ्यावे लागेल, यातून उद्भवणाऱ्या परिणामास शासन जाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला.