जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वाळू कंत्राटदार लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील रस्त्यांची वाट लावली-आशुतोष काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

विरोधी पक्षाचे आमदार असताता माजी आमदार अशोक काळे यांनी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधून दळण वळणाचा प्रश्न मार्गी लावला. मात्र तालुक्यातील वाळू कंत्राटदार लोकप्रतिनिधींनी मात्र वाळूठेके घेऊन त्यातून मोठी कामे करत तालुक्यातील रस्त्यांची मात्र वाट लावली असल्याची टीका कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी तालुक्याच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे जाहीर सभेत केली आहे.

चासनळी व परिसरातील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेला मंजूर बंधारा २०१६ ला गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला होता. त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी व विहिरीचा समावेश होता.त्यानंतर यावर्षी आलेल्या महापुरातही हा बंधारा पुन्हा वाहून गेला. पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून जाण्याचा अनास्था प्रसंग घडला. या मंजूर बंधार्‍याची डागडुजी व देखभाल करण्याचे काम तालुक्याच्या आमदारांकडे आहे.२०१६ मध्ये या मंजूर बंधार्‍याची जर चांगल्या प्रकारे दुरुस्ती केली असती तर हा बंधारा पुन्हा वाहून गेलाच नसता -आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मतदारांच्या भेटी आशुतोष काळे यांनी घेतल्या याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान आमदार सपशेल अपयशी ठरल्या आहेत. ज्यांच्या पक्षाचे सरकार राज्यात व देशात होते त्यांच्याकडून तालुक्याच्या जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या मात्र या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे ज्या भागात गेलो त्या ठिकाणचे भाजप चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे.
चासनळी व परिसरातील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेला मंजूर बंधारा २०१६ ला गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी व विहिरी या बंधाऱ्यात वाहून गेल्या होत्या. त्यानंतर यावर्षी आलेल्या महापुरातही हा बंधारा पुन्हा वाहून गेला. पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. या मंजूर बंधार्‍याची डागडुजी व देखभाल करण्याचे काम तालुक्याच्या आमदारांकडे आहे.२०१६ मध्ये या मंजूर बंधार्‍याची जर चांगल्या प्रकारे दुरुस्ती केली असती तर हा बंधारा पुन्हा वाहून गेलाच नसता पण त्यांनी त्यावेळी या बंधार्‍याची तात्पुरती डागडुजी केल्यामुळे मंजूर बंधारा पुन्हा वाहून गेला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले याला सर्वस्वी तालुक्याच्या आमदार जबाबदार आहेत त्यामुळे आमदारांच्या या कार्यपद्धतीला शेतकरी सुद्धा वैतागलेले असून अशा कर्तव्यशून्य आमदारांना आगामी २१ ऑक्टोबरला त्यांची जागा दाखवून देऊन २०१४ ला झालेली चूक सुधारून घ्या असे आवाहन आशुतोष काळे यांनी मतदारांना शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close