जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात पहिल्यांदाच धुक्याची चादर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने बऱ्याच दिवसांनी हजेरी लावून रब्बी पिकांना दिलासा दिला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असताना काल सकाळी धुक्याची चादर दिसून आली आहे.या धुक्याने वहातुकीवर कुठलाही प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.

धुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात.पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात.त्यास एक निम्न पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते. नजिकच्या पाण्याच्या स्रोतांचा, उंचसखलतेचा व वाऱ्याच्या वेगाचा यावर फार जास्त असर पडतो.

धुक्याद्वारे जहाज वाह्तूक, प्रवास, विमानोड्डाण व युद्धे यावरही बराच प्रभाव पडतो.दृश्यता कमी असल्यामुळे अनेक विमानोड्डाणे रद्द केले जातात तसेच महामार्गावरील वाहतूकीत यात अडथळा निर्माण होतो वाहने हळू चालवावी लागतात व प्रसंगी अपघातही घडतात.सहसा थंड वातावरण असतांना धुक्याचे प्रमाण वाढते.हवेच्या निम्नपातळीवर या दरम्यानचे तापमानाचा फरक २.५ o सेल्सियस अथवा ४ o फॅरनहाइट पेक्षा कमी असल्यास धुक्याची निर्मिती होते.धुके सुरु झाल्यावर पाऊस बंद होतो असे सामान्यपणे मानले जाते.तर दुसरीकडे हवामान खात्याने मात्र अद्याप पाऊस सांगितला असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close