जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध वाळूचोरी जोरात,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु असून या विरोधात मिळालेल्या गुप्त खबरीवरून पोलिसांनी सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत एक स्वराज ट्रॅक्टरसह निळ्या रंगाची ट्रेलर एक ब्रास वाळूसह ०२ लाख १० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून आरोपी अमोल सोनवणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

“वाळूला मिळणारे सोन्याचे भाव पाहता या व्यतिरिक्त वाळूचोर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत असून महसूल विभागापुढे मोठे आव्हान निर्माण करत आहेत.या वाळूचोरीत आता पर्यंत वाळू चोर सहभाग नोंदवत मात्र अलीकडील काळात तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी दाखवून देत आहे हि चिंतेची बाब आहे”

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून शासनाने या तालुक्यात अनेक ठिकाणी लिलाव करून वाळू विक्री सुरु केली आहे.मात्र वाळूला नाशिक औरंगाबाद आदी ठिकाणी वाळूला मिळणारे सोन्याचे भाव पाहता या व्यतिरिक्त वाळूचोर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत असून महसूल विभागापुढे मोठे आव्हान निर्माण करत आहेत.या वाळूचोरीत आता पर्यंत वाळू चोर सहभाग नोंदवत मात्र अलीकडील काळात तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी दाखवून देत आहे.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.अशीच घटना नुकतीच सांगवी भुसार येथे घडली असून त्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

या खबरी नुसार कोपरगाव तालुका पोलिसानी केलेल्या कारवाईत दि.२२ जून रोजी मध्यरात्री १२.४० वाजेच्या सुमारास एक स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रेलरसह ट्रॅक्टर एक ब्रास वाळू चोरी करताना आढळला होता.त्यानुसार तालुका पोलिसानी केलेल्या कारवाईत आरोपी सुरेगाव येथील आरोपी अमोल काशिनाथ सोनवणे हा आपल्या आर्थिक फायद्यासाठी वाळूचोरी करताना रंगेहात पकडला गेला आहे.

त्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस कॉ.अंबादास वाघ यांनी क्रं.२२९/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.ए.डी.बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close