जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी खा.काळे यांच्या पासून प्रेरणा घेऊन आपला राजकीय प्रवास

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या जडणघडणीत माजी खा.शंकरराव काळे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या जीवनापासून आपण प्रेरणा घेऊन आपण आपली राजकीय वाटचाल करत असून आगामी काळात जनसेवेत कार्यरत राहू असे आश्वासन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच कोळपेवाडी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

“मागील वर्षी देखील कोपरगावच्या जनतेसोबत कोरोना संकटाशी मुकाबला करून कोरोनावर वर्चस्व मिळविले होते.मात्र मागील एक महिन्यापासून कोरोनाने पुन्हा नव्या जोमात सुरु केलेले तांडव चिता वाढविणारे असले तरी नागरिकांनी घाबरून जावू नये आपण सदैव जनतेच्या पाठीशी आहे”-आ.आशुतोष काळे.

कोसाका उद्योग समुहाचे शिल्पकार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली त्यावे वेळी ते बोलत होते.

यावेळी १०० व्या जयंतीचे औचित्य साधत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरणासाठी घेवून जाणाऱ्या मोफत बससेवेचा शुभारंभ माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपोस्थितीत आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर प्रसंगी माजी आ.अशोक काळे,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,उपाध्यक्ष नारायण मांजरे,सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे सर्व सदस्य, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,सर्व संचालक मंडळ तसेच गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते,शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधुजी कोळपे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,जी.प.सुधाकर दंडवते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक व सर्व संलग्न संस्थांचे पदाधिकारी सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत आहे. अशा परिस्थितीत समाजाला आधार देणं हे आपले कर्तव्य आहे.समाजाला अग्रक्रम देणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०० व्या जयंतीनिमित कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व कुटुंबाना मोफत सॅनिटायझर व ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.परिस्थिती कशीही असो अशा परिस्थितीत आपली बांधिलकी समाजाशी असावी हे त्यांनी शिकविले आहे.त्यांचा आदर्श समोर ठेवून आजवर आपण व्यक्तिगत जीवनात दुःखापेक्षा समाजहिताला नेहमी प्राध्यान्य देत आलो आहे.त्यामुळे सद्यपरिस्थितीत समाजाप्रती असलेलं कर्तव्य पार पाडण्याला प्राधान्य देवून मतदार संघातील जनतेला सोबत घेवून कोरोनाच्या लढाईत सर्व ताकदीशी सक्रीय झालो आहे.मागील वर्षी देखील कोपरगावच्या जनतेसोबत कोरोना संकटाशी मुकाबला करून कोरोनावर वर्चस्व मिळविले होते.मात्र मागील एक महिन्यापासून कोरोनाने पुन्हा नव्या जोमात सुरु केलेले तांडव चिता वाढविणारे असले तरी नागरिकांनी घाबरून जावू नये.आपण सदैव जनतेच्या पाठीशी आहे.यावर्षी मुखपट्या,सुरक्षित अंतर, सॅनिटायझर बरोबरच आपल्याकडे कोरोना प्रतिबंधक लसीचे सुरक्षा कवच आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात आपण पुन्हा एकदा कोरोना संकटावर वर्चस्व प्रस्थापित करू असा विश्वास आ.काळे यांनी यावेळी व्यक्त केला.वैश्विक कोरोना महामारीने संपूर्ण विश्वाला बेजार केले असले तरी त्यावर मात करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेवून जनतेला अपेक्षित असलेली विकासाची कामे मार्गी लावून जनतेला कठीण काळात आधार देण्यास अखंडपणे बांधील असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close