कोपरगाव तालुका
आ.काळेंची शहरातील कामामुळे तालुक्याला नव्याने ओळख-रोहोम
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तालुक्याच्या माजी आमदारांनी नुकतीच अर्धवट माहितीच्या आधारे सवंग लोकप्रियतेसाठी पाणी पुरवठा योजनांचा वीज प्रवाह खंडित केल्याचे प्रसिद्धी पत्रक अर्धवट माहितीच्या आधारे प्रसिद्ध करून तालुक्याची दिशाभूल केल्याचे प्रतिपादन कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी केले आहे.
” कोपरगावच्या आ.काळे यांच्या कामाची ओळख कोपरगाव शहरातील नागरिकांनानुकतीच नव्याने झाली असून शहर विकासात खीळ घालण्यासाठी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केलेल्या विकासकामांच्या निविदा त्यांच्या पाठपुराव्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केल्या आहेत.त्यामुळे आपण काय करतोय याचे मूल्यमापन करा व पूर्ण माहिती घेवूनच वक्तव्य करा”-सुधाकर रोहोम,उपाध्यक्ष काळे कारखाना.
कोपरगावचे आमदार काय करतात असा प्रश्न नुकताच कोपरगावचे भाजपचे माजी आ.कोल्हे यांनी विचारला आहे.त्याबाबत तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधींना माझे एवढेच सांगणे आहे की,”आपण १७ पाणी पुरवठा योजनांचे वीजप्रवाह खंडित केल्याची व पाणीपुरवठा बंद झाल्याची प्रसिद्ध केलेली बातमी हि पूर्णत: चुकीची आहे. त्याबाबत आपण सविस्तर माहिती घ्या.अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नका असा सल्ला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना नाव न घेता दिला आहे.
माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील १७ पाणी पुरवठा योजनांचे वीजबिल थकल्यामुळे वीजप्रवाह खंडित केल्याची चुकीची बातमी प्रसिद्ध करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला होता.त्याबाबत उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खुलासा केला आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खुलासा करतांना उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी असे म्हटले आहे की, तालुक्याच्या माजी आमदारांना अर्धवट माहिती मिळाली आहे. तालुक्यातील १७ पाणी पुरवठा योजनांचे वीजबिल थकल्यामुळे वीजप्रवाह खंडित केल्याचे व पाणी पुरवठा बंद झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. येसगाव,अंचलगाव,माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, करंजी, मळेगाव थडी, कारवाडी, मंजूर, वेळापूर, चासनळी, हंडेवाडी, कोळगाव थडी, वडगाव, सडे, धोंडेवाडी आदी १६ गावातील १३ गावांचा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु आहे. यापैकी वडगाव, सडे पाणी योजनांचा दोन दिवसांपूर्वी व धोंडेवाडी पाणी योजनेचा बारा दिवसांपूर्वी वीजप्रवाह खंडीत करण्यात आला आहे. त्याबाबत नियोजन करून या योजनांचा वीजप्रवाह सुरळीत होईल. त्यामुळे तालुक्याच्या माजी आमदारांनी १७ पाणी पुरवठा योजना बंद केल्या असल्याचे वृत्त पूर्णत: चुकीचे आहे. त्यामुळे यापुढे अशा अर्धवट माहितीच्या आधारे चुकीचे वक्तव्य करू नका असा सल्ला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी दिला आहे.