कोपरगाव तालुका
नर्मदाबाई लाड यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर (वार्ताहर)
संवत्सर (वार्ताहर)
संवत्सर येथील कार्यकर्ते भिकन लाड यांच्या मातोश्री नर्मदाबाई परशराम लाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्या ९५ वर्षाच्या होत्या. संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. नर्मदाबाई या धार्मिक वृत्तीच्या होत्या. वारकरी सांप्रदायाची त्यांना आवड होती. परिसरातील विविध धार्मिक कार्यक्रमात त्या नेहमीच अग्रभागी असायच्या. अंत्यविधी प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील, उपसरपंच विवेक परजणे यांच्यासह संवत्सर परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.