कोपरगाव तालुका
धारणगाव रस्ता बंद,व्यापाऱ्यांचे नुकसान,काम त्वरित पूर्ण करा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावर असलेला व बस स्थानकाशेजारील गटारीचे काम कोपरगाव नगरपरिषदेने नुकतेच सुरु केले आहे त्यामुळे हा मार्ग दि.१० मार्च पासून बंद केला आहे. त्यामुळे या मार्गवारील वाहतूक बंद झाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम या मार्गाच्या कडॆला असलेल्या व्यापारी आस्थापणावर झाला आहे.त्यामुळे या गटारीचे काम पालिका प्रशासनने तातडीने पूर्ण करावे अशी महत्वपूर्ण मागणी जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.
“पुलाचे काम सुरु केल्याने धारणगाव मार्गावरील वाहतूक दि.दहा मार्च पासून बंद केली आहे.त्यामुळे खुले नाट्यगृह,पुढे धारणगाव रोड लगत असलेल्या मार्गावरील दळणवळण बंद पडल्याने नागरिकांची वर्दळ बंद झाल्याने व्यापार पार थंडावला आहे. त्यामुळे हे काम संबंधित ठेकेदार व पालिकेने तातडीने पूर्ण करावे”-उमेश धुमाळ,व्यापारी व जेष्ठ कार्यकर्ते,कोपरगाव.
कोपरगाव नगरपरिषदेच्या विविध प्रभागात विकास कामे सुरु आहे.विविध विकास कामासोबतच स्वच्छतेचे पालिकेचे काम डोळ्यात भरण्यासारखे आहे.विविध रस्त्यांच्या कामाला भाजपच्या नगरसेवकांनी ठरावाला विरोध केल्याने तात्कालिक गतिरोध निर्माण झाला आहे.त्यावर आ.आशुतोष काळे यांच्या गटाचे नगरसेवक व पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी जिल्हाधिकारी यांची नुकतीच भेट घेऊन ते ठराव संमत करून त्यास हिरवा कंदील मिळावा अशी मागणी केली आहे.त्याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले असतांना पालिकेच्या बांधकाम विभागाने नुकतेच डॉ.आंबेडकर पुतळा ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा या धारणगाव मार्गावरील गटारीचे रस्ता ओलांडण्याचा स्लॅब टाकण्याचे काम बस स्थानका शेजारी संबंधित ठेकेदाराने सुरु केले आहे.त्यासाठी पुतळ्याच्या वायव्येस खोदाई केली आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दि.दहा मार्च पासून बंद केली आहे.त्यामुळे खुले नाट्यगृह,पुढे धारणगाव रोड लगत असलेल्या मार्गावरील दळणवळण बंद पडल्याने नागरिकांची वर्दळ बंद झाल्याने व्यापार पार थंडावला आहे. त्यामुळे हे काम संबंधित ठेकेदार व पालिकेने तातडीने पूर्ण करावे अशी महत्वपूर्ण मागणी जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.