कोपरगाव तालुका
माहेगाव देशमुख येथे विविध कामांचे भूमिपूजन संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे जिल्हा परिषद रस्ते दुरुस्ती गट ब कार्यक्रम २०१९-२०२० अंतर्गत ४० लक्ष निधीतून रा.मा. ७ ते माहेगाव देशमुख रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण,मुख्य लेखाशिर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत १० लक्ष निधीतून मुकुंद खैरनार घर ते भरत दाभाडे घर रस्ता खडीकरण कामाचे तसेच जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे भूमिपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
रस्ते दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ करतांना आ. काळे हे स्वत: जातीने चांगल्या दर्जाचे रस्ते तयार होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे.रस्ते तयार करताना साईड बाजूने नाले केल्यास पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी वाहून या रस्त्यांचे आयुर्मान वाढते.रस्त्यांसाठी वारंवार निधी उपलब्ध होत नाही त्यामुळे होणारे रस्ते हे टिकावू होणे गरजेचे असून त्यासाठी रस्त्याच्या बाजूने साईड गटार आवश्यक आहे.साईड गटार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व असलेली अतिक्रमणे सामोपचाराने दूर करून तसेच रस्ते टिकावू होण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,संभाजीराव काळे,सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे,उपसरपंच बाळासाहेब विश्वनाथ पानगव्हाणे,लक्ष्मण पानगव्हाणे,बापूसाहेब जाधव,इंद्रभान पानगव्हाणे,सुंदरराव काळे,भास्करराव काळे,रविंद्र काळे,बाबासाहेब चांगदेव पानगव्हाणे,उपाध्यक्ष प्रकाश काळे,तुळशीराम पानगव्हाने,कामगार संचालक अरुण पानगव्हाणे,के.पी.रोकडे,वसंतराव जाधव,सुनील जाधव,मच्छिंद्र जाधव,पंचायत समिती उपअभियंता उत्तम पवार,शाखा अभियंता एस.बी.दिघे,ग्रामसेवक जी.पी.शेळके, सर्व ग्रामपंचायत सदस्य,माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.