कोपरगाव तालुका
इंधन दरवाढ,राष्ट्रवादी कडुन दर कमी करण्याची मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल-डीझेल दरवाढ कमी करावी अशी प्रमुख मागणी कोपरगावच्या राष्ट्रवादी काँग्रेश्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.हे निवेदन नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनीं स्वीकारले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी अनेक दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २३ पैशांची आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे-माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी अनेक दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २३ पैशांची आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल ८४.२० रुपयांवर आणि डिझेल ७४.३८ रुपयांवर पोहोचले. मुंबईत हेच दर अनुक्रमे ९०.८३ आणि ८१.०७ रुपये इतके होते.जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ५४ डॉलर्स प्रतिबॅरलवर गेले आहेत.याच्या परिणामी तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ सुरु केली आहे.सुमारे महिनाभर दर स्थिर ठेवल्यानंतर नुकतेच कंपन्यांनी पेट्रोल,डिझेल दरात वाढ केली होती.यानंतर काल पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली.डिझेल दराचा विचार केला तर मुंबईमध्ये डिझेलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर गेले आहेत त्यामुळे त्याचे प्रतिकूल पडसाद आता उमटू लागले आहे.त्याला कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रवादी अपवाद नाही.
काही जून महिन्यापासून टाळेबंदी उठल्यापासून हळूहळू सर्व छोटे-मोठे व्यवसाय सुरु होत असतांना वाढलेल्या पेट्रोल-डीझेल दरवाढीमुळे विपरीत परिणाम होवून या व्यावसायिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे.त्यासाठी करण्यात आलेली पेट्रोल-डीझेल दरवाढ कमी करून सर्व समान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करून दिलेल्या निवेदनात कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
सदरचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी स्वीकारले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,विठ्ठलराव आसने,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,शहर कार्याध्यक्ष संतोष चवंडके,संदीप कपिले,वाल्मिक लहिरे,जिल्हा संघटक देवेन रोहमारे,अॅड.मनोज कडू,कृष्णा आढाव,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,राहुल देवळालीकर,चंद्रशेखर म्हस्के आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.