कोपरगाव तालुका
पत्रकारांवर दहशत केली तर आम्ही पत्रकारांबरोबर-नगराध्यक्ष
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशातील वर्तमानपत्रांचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायीकरण झाले आहे.वर्तमान काळात बातमी जशी यायला हवी तशी येत नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे आपण सुरुवातीच्या काळात फलकाचा वापर केला पुन्हा तीच वेळ आपल्याला नगरपरिषदेचा कालावधी संपल्यावर येणार नाही अशी अपेक्षा करून दुसरीकडे पत्रकारांवर काही असामाजिक तत्व दहशत करीत असेल तर आपण पत्रकारांबरोबर राहू असे आश्वासन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“वर्तमान काळात बातमी जशी यायला हवी तशी येत नाही हे दुर्दैव आहे,त्यामुळे आपण सुरुवातीच्या काळात फलकाचा वापर केला पुन्हा तीच वेळ आपल्याला नगरपरिषदेचा कालावधी संपल्यावर येणार आहे मात्र स्वप्नील निखाडे यांनी आगामी निवडणुकीत आपल्याला “अध्यक्षपदा”साठी शब्द दिला (ते तसा देणार नाही) तर आपण पुढेही अध्यक्ष होऊ”नगराध्यध्यक्ष विजय वहाडणे यांचा खडा
महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे.महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे.यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.त्यानिमित्त हा पत्रकार दिन साजरा करण्यात येतो.कोपरगाव नगरपरीषदेने नुकतेच पत्रकार दिनाचे आयोजन केले होते त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,व शहरातील पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”वर्तमान काळात पत्रकारांचा आवाज क्षीण झाला आहे त्याला वर्तमान पत्रांचे मालक व भांडवलंदार जबाबदार आहे.आज वर्तमान पत्रांचे आवाज भांडवलाच्या बळावर दाबले जात आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांनी या पुढे या चौथ्या खांबांवर किती विसंबुन राहायचे आता ठरवायची वेळ आली का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.वर्तमान काळात सामाजिक संकेतस्थळे विकसित होत आहे.त्यामुळे कोरोना काळात या माध्यमांनी मोठी भूमिका निभावली आहे.वर्तमानपत्रे वाचावयाचे प्रमाण कमी झाले होते मात्र आता अजून जुनी पिढी वर्तमान पत्रे वाचत आहे.दिवसेंदिवस हे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.आज त्यांची वाढ झाली आहे.मात्र भविष्य मात्र कठीण दिसत आहे.या वेळी त्यांनी शहरात राजकीय अभय मिळत असल्याने अवैध व्यवसाय वाढला असल्याचे निरिक्षण नोंदवले आहे व वाढलेल्या अवैध व्यवसायाबाबत माध्यमांनी गप्प बसता कामा नये असा सल्ला दिला आहे. काही राजकीय नेते वाळुवाले व त्यांच्या हस्तकांकडून हप्ते घेतात हे वास्तव आहे.हे हप्ते कोणाकडून येतात याचा शोध घेतला पाहिजे.कोरोना काळात कोपरगावातील पत्रकारांनी मोठी भूमिका निभावली असल्याची पाठीवर त्यांनी थाप मारली असून आगामी काळही अजून कठीण असून या पुढेही पत्रकारांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले तर सुत्रसंचलन महारुद्र गालट यांनी तर उपस्थितांचे आभार उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी मानले आहे.यावेळी उपस्थित पत्रकारांचा अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.