कोपरगाव तालुका
संत जगनाडे महाराजांच्या सभामंडपाचे भूमिपूजन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर येथील संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टच्या वतीने मंगळवार दि.१२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व समाज मंदिराचा सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डी येथील जेष्ठ कार्यकर्ते नारायण लुटे हे राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
संत तुकारामांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला.तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले,की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो.आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले.संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.
संत तुकाराम महाराज यांचे काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते.तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती.असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते.त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला.तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले,की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो.आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले.संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.त्यांनी स्वतः काही रचना केल्या आहेत.त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी संत तुकाराम आले असल्याचे मानले जाते.त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे.त्यांचीच आठवण ठेऊन कोपरगावात हा सभामंडप उभा राहात आहे.
या कार्यक्रमास शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे,आ. संदीप क्षीरसागर,जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, महाराष्ट्र तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार,महासचिव प्रा.डॉ.भूषण कर्डीले,काँग्रेस ओ. बी.सी.सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,येवला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,सेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे,माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी,सचिव रामदास गायकवाड आदींनी केले आहे.