कोपरगाव तालुका
साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव येथील नगरपरिषदेच्या माजी उपनागराध्यक्षा मीनल खांबेकर यांचे पती व साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे माजी विश्वस्त अशोक भिमाशंकर खांबेकर (वय-६५) यांचे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नाशिक येथे कोरोनाचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी मीनल खांबेकर,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.अशोक खांबेकर यांनी आपल्या पत्नीला दोनदा कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक,उपनगराध्यक्ष व काही काळ प्रभारी अध्यक्ष बनविण्यात मोलाची भूमिका निभावली होती.त्यांचा जनसंपर्क भारतभर पण दांडगा होता.अनेकांची नावे व मोबाईल क्रमांक ,नातेगोते,अधिकारी त्यांचे पद यांचे ते चालते-बोलते संगणक होते.आज रात्री आठ वाजता त्यांच्यावर कोपरगाव येथील अमर धाम येथे अंतिम निरोप देण्यात येणार आहे.
स्व.अशोक खांबेकर यांचे वडील भीमाशंकर खांबेकर हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे व काँग्रेसचे खंदे समर्थक व शिर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते.त्यांचा समर्थ वारसा अशोक खांबेकर त्यांनी चालवला होता. त्या नंतर दुसऱ्या पिढीतील मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. ते ही अखेरपर्यंत काँग्रेसचे समर्थक होते.त्यांनी कोपरगाव तालुक्यात काँग्रेस जिवंत ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली होती.त्यांचे नगर जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठे योगदान दिले.ते पी.टी.आय.चे पत्रकार म्हणूनही अनेक वर्षे सेवा केली. त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन पाडण्यात मोलाची भूमिका निभावली होती.गोदाप्रवरा साप्ताहिकाचा पहिला अंक त्यांनी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काढला होता.कोपरगाव पत्रकार संघाचे ते संस्थापक व पुढे तीस वर्ष प्रदीर्घ काळ सचिव होते.जुने पत्रकार स.म.कुलकर्णी यांचे ते कनिष्ठ सहकारी होते.त्यांनी आपल्या पत्नीला दोनदा कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक,उपनगराध्यक्ष व काही काळ प्रभारी अध्यक्ष बनविण्यात मोलाची भूमिका निभावली होती.त्यांचा जनसंपर्क भारतभर पण दांडगा होता.अनेकांची नावे व मोबाईल क्रमांक,नातेगोते,अधिकारी त्यांचे पद त्याचे ठिकाण यांचे ते चालते-बोलते संगणक होते.साई संस्थान मध्ये त्यांची व माजी विश्वस्त डॉ.एकनाथराव गोंदकर यांची कारकीर्द संस्थानच्या हिताची ठरली होती.त्यांनी अनेक संस्थान अहिताचे निर्णय समितीला फिरायला लावले होते.व संस्थान हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडले होते.कान्होबाची मढी येथील विश्वस्त मंडळावरही पाच वर्ष विश्वस्त होते.कोपरगाव तालुका एकजुकेशन सोसायटीवर संचालक म्हणूनही काही वर्ष कार्यरत होते.त्यांचे अनेक काँग्रेसी नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते त्यातीलच माजी केंद्रीय रस्ते विकास राज्यमंत्री के.एच.मुनिअप्पा यांचेकडुन त्यांनी कोपरगाव शहर व बेट यांना जोडणारा छोटा पुलाची मंजुरी मिळवली होती.साई संस्थान मध्ये सर्वप्रथम राज्य केडरचे अधिकारी आणण्यातही त्यांनी मोलाची भूमिका निभावली होती.
त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यांना आधीच दीर्घ आजार असल्याने कोरोना उपचारासाठी त्यांच्यात प्रतिकार शक्तीने साथ न दिल्याने कोरोना निरंक होऊनही ते सावरले नाही.आज नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मालवली आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील स्मशान भूमीत आज रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.
त्यांच्या निधनाने माजी आ.अशोक रोहमारे,आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,साई संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथराव गोंदकर,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.