जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात तीन दिवशीय नेत्ररोग शिबिराचे आयोजन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने तीन दिवसीय नेत्र रोग तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले आहे.शिबिराचे उद्घाटन श्री हॉस्पिटल सप्तर्षीमळा येथे करण्यात आले आहे.त्याला शिबिराच्या पहिल्याच दिवशी कोपरगावातील नागरिकांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे.

सध्याच्या धावपळीच्या युगात नेत्राचे आजार सामान्य नागरिकांमध्ये वाढत आहेत.या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास याचे परिणाम शरीरावर होतात.मात्र याचा मोठा फटका बसतो तो डोळ्यांना.डोळ्यांच्या आतील नेत्र-पटलावर म्हणजे रेटीनावर देखील मधुमेहाचे दुष्परिणाम होऊन पूर्णपणे अंधत्त्व येण्याची शक्यता असते त्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

डोळ्याच्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अन्य आजारांचा सामना करावा लागून पूर्णपणे अंधत्त्व येण्याची शक्यता असते.हे टाळण्यासाठी वेळीच निदान होऊन त्यावर उपचार होणे गरजेचे असते.त्यासाठी या शिबोराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात नाममात्र दरात डोळ्यांची तपासणी मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येत आहे.आर्थिक दुर्बल घटकांसाठी डोळ्यांची तपासणी करण्यासाठी जास्त पैसे खासगी दवाखान्यात मोजावे लागतात ही बाब लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर बुधवार ९ रोजी लक्ष्मीमाता मंदिर व हनुमान मंदिर,शिवनेरी चौक,सुभाषनगर येथे तर गुरुवार १० रोजी शुक्लेश्र्वर मंदिर बेट येथे घेण्यात येणार आहे.तरी कोपरगाकरांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी केले आहे.हे शिबिर अल्प दरात असून सर्व सामान्य नागरिकांनी व गरजूंना याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक सामाजिक कार्य या पुढे करणार असल्याचे एस.टी.कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.यावेळी विधानसभा संघटक अस्लम शेख,ज्येष्ठ शिवसैनिक कुक्कुशेठ सहानी,दिलीप अरगडे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख व नगरसेविका सपना मोरे,वर्षा शिंगाडे,महिला आघाडी शहरप्रमुख राखी विसपुते,विक्रांत झावरे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,भूषण पाटणकर,प्रफुल्ल शिंगाडे,गगन हाडा,गोपाल वैरागळ,संघटक बाळासाहेब साळुंके,नितीन राऊत,विशाल झावरे,विभाग प्रमुख रफिक शेख,जयेश हस्वाल,विजय शिंदे,मयूर दळवी,रामदास शिंदे,निशांत झावरे,शिव व्यापारी सेनेचे योगेश मोरे,मयुर खरनार,शिववाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,शहरप्रमुख जाफर सय्यद,उपशहरप्रमुख राकेश वाघ,प्रवीण शेलार, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे,सतीश शिंगाणे,प्रवीण देशमुख,चेतन सोमवंशी,विजय सोनवणे,भूषण वडांगळे,दिपक दळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close