जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुकागुन्हे विषयक

कोपरगावातील “तो” फलक फाडला, पोलिसांत तक्रार दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नूतन वर्ष व दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर कोपरगाव तालुका ट्रक चालक-मालक ट्रान्सपोर्टर अशोशिएशनच्या वतीने नुकताच अण्णाभाऊ साठे चौकात “ज्याचा माल,त्याचा हमाल” या डिजिटल फलकाचा अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला असताना हा फलक काही व्यापारी व बाजार समितीचे सचिव यांनी संगनमत करून फाडून-तोडून फेकून दिल्याचा आरोप कोपरगाव तालुका ट्रक चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अय्यूब कच्छी यांनी नुकताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केल्याने खळबळ उडाली आहे.

माल वाहतूक ट्रकमध्ये माल भरताना व खाली करताना ट्रक चालक-मालक यांचे सरकारच्या चुकीच्या धोरणाने कंबरडे मोडले आहे.त्यांच्या मागे थर्ड पार्टी विमा,ट्रक मधील मालाचा विमा काढणे.इंधन दर वाढ,अशा अनावश्यक कामगिरीने वाहतुकदार बेजार झाले आहे.मात्र याबाबत कोणीही विचार करायला तयार नाही.याबाबत कोपरगावकरांनी आता आवाज उठवला आहे हि बाब स्तुत्य आहे.

माल वाहतूक ट्रकमध्ये माल भरताना व खाली करताना ट्रक चालक-मालक यांचे कंबरडे मोडले आहे.त्यांच्या मागे थर्ड पार्टी विमा,ट्रक मधील मालाचा विमा काढणे.इंधन दर वाढ,अशा अनावश्यक कामगिरीने वाहतुकदारांचे कंबरडे मोडले आहे.मात्र याबाबत कोणीही विचार करायला तयार नाही.त्यामुळे माल वाहतुकदारांत मोठा असंतोष पसरला आहे.या विरोधात देशभर वणवा पसरला असून त्याचे पडसाद कोपरंगावातही उमटले आहे.व याविरोधात आवाज उठवला आहे.सरकारने सन २०१६ साली ज्याचा माल त्याचा हमाल हे धोरण जाहीर करून ट्रक चालकांची या अन्यायकारक नियमातून सुटका केली आहे.असे असताना कोपरगावात मात्र या शासन आदेशा विरुद्ध वर्तणूक सुरु आहे.या संघटनेने कोपरगाव बाजार समितीच्या परवानगीने फलक लावूनही तो काही असामाजिक तत्त्वांनी बेकायदा काढून टाकल्याने कहर झाला आहे.याबाबत या संघटनेने रीतसर साई ट्रेडर्सचे राजू सांगळे व ऋषी सांगळे यांच्या विरुद्ध दमबाजी व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

या प्रसंगी ट्रक चालक-मालक ट्रान्सपोर्टर असोशिएशन अध्यक्ष आयुबभाई कच्छी,उपाध्यक्ष भारत वैद्य,सचिव शैलेश रावळ,उल्हास शेठ,आडत व्यापारी ललीत धाडीवाल आदी मान्यवरांसह अनेक सभासद उपस्थित होते.मात्र या फलकाची शाई वाळते न वाळते तोच काही विघ्नसंतोषी व्यापारी यांनी त्यात खोडा घालण्याचे काम सुरु केले आहे.शासनाने या बाबत रीतसर परिपत्रक काढून दि.०६ सप्टेंबर २०१६ रोजी आदेश लागू केले आहे.असे असताना काही व्यापारी षडयंत्र आखून ट्रक चालक-मालक यांची लुबाडणूक करत आहे.याबाबत संघटनेने आवाज उठवून रीतसर बाजार समितीची परवानगी घेऊन अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ फलक लावला होता.मात्र विघ्नसंतोषी व्यापारी यांनी त्यात खोडा घालण्याचे का सुरु केल्याने ट्रक चालक-मालक यांच्यात असंतोष पसरला आहे त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज देऊन याबाबत न्याय मागीतला आहे.मात्र या कुटील कारस्थानात बाजार समितीचे सचिव देखील सामील असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.वर्तमानात बाजार समितीच्या संचालकांची मुदत संपली आहे.त्यामुळे त्याठिकाणी प्रशासक नेमलेले आहे.त्यामुळे ते या घटनेकडे कानाडोळा करत असून अवैध हमाली तोलाई ट्रक चालक-मालकांवर लादणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आहेत.निवेदनावर कोपरगाव ट्रक चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अय्यूब फकिरमहम्मद कच्छी यांची सही आहे.याबाबत बाजार समितीचे सचिव श्री.रणशूर यांचेशी संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close