कोपरगाव तालुका
कोपरगावात दिवाळीस गड-किल्ले बांधणी स्पर्धा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
डिजिटल नवरात्र उत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर दरवर्षीप्रमाणे नागरिकांना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या संकल्पनेतून व आ.आशुतोष काळे फौंडेशन यांच्या वतीने डिजिटल दिवाळी,पहाट पाडवा कार्यक्रम व शिववैभव पर्यावरण पूरक गड किल्ले बांधणी स्पर्धा व आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत.या आपल्या सुवर्णमयी इतिहासाचे साक्षीदारांबाबत आगामी पिढीला माहिती होणे आजची गरज आहे.त्या साठी जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी गड-किल्ला बांधणी स्पर्धांचे आयोजन केले आहे.
राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड इ. महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते.श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला.त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे (ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही रायगडच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले,जलदुर्ग आहेत.ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत.या आपल्या सुवर्णमयी इतिहासाचे साक्षीदारांबाबत आगामी पिढीला माहिती होणे आजची गरज आहे.त्या साठी जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी गड-किल्ला बांधणी स्पर्धांचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आ.आशुतोष काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून नागरिकांना पाहता येणार आहे.
आपले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्याचे प्रतिक असून या प्रत्येक किल्ल्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.तसेच हे गडकिल्ले आपल्या राज्याची ओळख देखील आहे. आपली संस्कृती व आपली परंपरा आपण जपलीच पाहिजे.त्यासाठी आपल्या परंपरा व आपल्या राज्याचे भूषण असलेल्या गडकिल्ल्यांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी गडकिल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये घरात बसूनच सहभागी होता येणार असून विजेत्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहे.त्या स्पर्धेचा निकाल सोमवार दि.१६ रोजी सायंकाळी ७.०० वा.जाहीर करण्यात येणार आहे.पहाट पाडवा कार्यक्रम यापूर्वी दरवर्षी होत होता मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम होणार नाही.त्यामुळे कोपरगावातीलच कलाकारांच्या कलाकृतीतून पहाट पाडवा कार्यक्रम साकारला आहे.हा दिवाळी पहाट पाडवा कार्यक्रम हा सोमवार दि.१६ रोजी सकाळी ७.०० वा.आ. काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर नागरिकांना पाहता येणार आहे.अशा आगळ्यावेगळ्या डिजिटल दिवाळी,पहाट पाडवा कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच शिववैभव पर्यावरण पूरक गड किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन घरात बसूनच आपला दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन चैताली काळे यांनी शेवटी केले आहे.