कोपरगाव तालुका
गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल-आशावाद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शाळेतील भौतिक सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास सरकारी शाळांत प्रवेशासाठी रांगा लागतील असा आशावाद राज्य शैक्षणिक धोरण समितीचे सदस्य अर्जून कोळी यांनी नुकताच कोपरगाव येथे एका कंर्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.
शिक्षणाचा ‘कोळी पॅटर्न’ नेमका काय आहे ?
केंद्रीय अभ्यासक्रम तसेच इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा सर्वाधिक आहे.मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणात सातत्यामुळे कराड नं.३ शाळा सर्वाधिक पटसंख्येची शाळा गणली जाते.इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी तब्बल अकराशे अर्ज आले होते.अडीच हजार पटसंख्य़ेची राज्यातील एकमेव शाळा आहे.मुख्याध्यापक कोळी यांनी विविध शैक्षणिक प्रयोगातून शाळेचा आलेख उंचावला आहे.शैक्षणिक योगदानासाठी राज्य सरकारने आदर्श शिक्षण पुरस्काराने गौरविले आहे.शैक्षणिक प्रयोगाच्या अभ्यासासाठी सिंगापूर,थायलंड दौऱ्यात सहभागी झाले होते.
राज्य शैक्षणिक धोरण समितीचे सदस्य अर्जुन कोळी यांनी नुकतीच कोपरगाव नगरपालिका शिक्षकांना सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना त्यांनी प्रयोगशील शिक्षणाचा ‘कोळी पॅटर्न’ उपस्थित शिक्षकांसमोर उलगडुन दाखवला आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी पटसंख्या असलेल्या कराड शाळा नं.३ चे प्रयोगशील मुख्याध्यापक म्हणून अर्जुन कोळी हे प्रसिद्ध आहेत. सरकारी शाळांना पटसंख्येअभावी उतरती कळा लागलेली असताना कोळी यांच्या नेतृत्वाखालील कराड नगरपालिका शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लागते.केंद्रीय शैक्षणिक धोरण निर्मिती समितीवरील राज्यातील एकमेव सदस्य आहेत.त्यामुळे त्यांच्या या प्रतिपादनास महत्व प्राप्त झाले आहे.
यावेळी बोलताना पुढे बोलताना ते म्हणाले की,गुणवत्ता हा निकष नक्कीच सर्व शाळांना लागू केला व मनापासून विद्यार्जन केले तर शाळा नावारूपास यायला वेळ लागत नाही.शिक्षकांच्या चांगल्या गुणांची पालक व विद्यार्थी नक्कीच कदर केल्याशिवाय राहत नाही.शाळेतील उपक्रम,गुणवत्ता वाढीचे प्रयत्न,शिक्षकांची भूमिका याविषयी संवाद साधला.या कार्यक्रमावेळी सुनिल रहाणे,भरत आगळे,कल्पना निंबाळकर यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास माळी,अरुण पगारे,सनी गायकर,गोपाल कोळी,अमोल कडू,अमित पराई,शिरसाठ सर,आरती कोरडकर,सविता साळुंके,नसरीन ईनामदार यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत शिंदे यांनी तर आभार सुनिता इंगळे यांनी मानले.