कोपरगाव तालुका
शहरातील नागरिकांनी कोपरगावतच खरेदी करावी-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गत सात महिन्यात कोरोना साथीच्या कालखंडात व्यापारावर प्रतिकूल परिणाम होऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.कोपरगावातील व्यापारी कायम सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याने आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी आपली बाजारपेठ उर्जित अवस्थेत आणण्यासाठी कोपरगावातच खरेदी करावी असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतेच केले आहे.
कोपरगावातील व्यापारी पेठ गत सात महिने जवळपास बंद होती.त्यामुळे शहरातील व्यापारी बंधूंचे मोठे नुकसान झाले आहे.नागरिकांचाही रोजगार मोठ्या प्रमाणावर बुडाला.अनेकांचे रोजगार हिसकावले गेले.हे संकट जागतिक असल्याने प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागली आहे.त्याला नागरिकही अपवाद नाही.शहरातील व्यापाऱ्यांनी सामाजिक योगदान दिले आहे.त्याचे स्मरण ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे-जनार्दन कदम,नगरसेवक.
कोपरगावसह जगभर कोरोनाने मार्च महिन्यात कहर उडवून दिला होता.कोपरगावात पहिला रुग्ण १० एप्रिल रोजी आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती.सरकारने जनतेचा स्वयंस्फूर्तीची पहिली संचारबंदी २२ मार्च रोजी जाहीर केली होती.तर सरकारने २४ मार्च पासून देशभर टाळेबंदी जाहिर केली होती.कोपरगावात ३७ नागरिकांना आपला जीव या साथीत गमवावा लागला आहे.अनेकांना या साथीची लागण झाल्याने त्याच्या वेदना मोठ्या होत्या.या घटना नक्कीच वेदनादायी आहे.अनेकांना यासाठीचा वित्तीय फटका बसला जीवित व वित्तीय हानी झाली आहे.हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.तो पासून आजतागायत कोपरगावातील व्यापारी पेठ गत सात महिने जवळपास बंद होती.त्यामुळे शहरातील व्यापारी बंधूंचे मोठे नुकसान झाले आहे.नागरिकांचाही रोजगार मोठ्या प्रमाणावर बुडाला.अनेकांचे रोजगार हिसकावले गेले.हे संकट जागतिक असल्याने प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागली आहे.त्याला नागरिकही अपवाद नाही.शहरातील व्यापाऱ्यांनी मात्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद असतानाही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून शहरात नागरिकांना मदत व्हावी म्हणून व्यापारी महासंघाने अनेक उपक्रम राबवले आहे.अनेक लोकांचा व्यवसाय बंद असल्याने छोटे व्यावसायिक फळे,भाजी विक्रेते तसेच हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची जगण्यासाठी धडपड सुरु होती.या परिस्थितीत अनेक मजूर व हातावर पोट भरणारे कुटुंब यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते.या दरम्यान कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन,लायन्स क्लब व इतर सामाजिक संस्था यांनी टाळेबंदीच्या काळात सुमारे दोन महिने गरीब व गरजू लोकांना मोफत घरपोच जेवण व किराणा सामान पुरविण्याचे काम केले आहे.कठीण परिस्थितीत जो सामाजिक जाणीव ठेवतो तोच खरा माणसाचा मित्र असतो याची जाणीव ठेवून व्यापाऱ्यांनी आपली जबाबदारी यथोचित पार पाडली आहे.आता शहर व तालुक्यात कोरोना जवळपास नियंत्रणात आला आहे.काही अपवाद अद्याप असल्याने जोखीम अद्याप संपलेली नाही.याचे भान ठेवून नागरिकांना शहरात गरज असेल तरच फिरावे लागणार आहे.मात्र आगामी सण उत्सव काळात नागरिकांनी आपल्या व्यापारी मित्रांचे भान ठेऊन आपली खरेदी गावातच होईल याची खबरदारी घेतली तर नक्कीच आगामी काळ आपल्याला उज्वल राहील असा विश्वासही नगरसेवक कदम यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील बाजारपेठेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांनी छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या आपल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या सर्वात मोठा सण असलेल्या दीपावली सणाची आवश्यक वस्तूंची खरेदी करावी व आपल्या शहरात कोरोना काळात सामाजिक दायित्व निभावणाऱ्या शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांकडून करून कोरोना काळात मोडकळीस आलेल्या बाजारपेठेतच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्यवहार करून बाजारपेठ भक्कम बनवण्याचे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती व नगरसेवक जनार्दन कदम यांनी शेवटी केले आहे.