जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

चालू वर्षी १७० लाख टन साखर शिल्लक राहणार-सूतोवाच

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

चालू गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी देशामध्ये अंदाजे ११० लाख टन साखर शिल्लक आहे.चालू हंगामात साखर उत्पादन व देशातील साखरेचा खप याचा विचार केल्यास १७० लाख टन साखर शिल्लक राहील असा अंदाज असल्यामुळे केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण घेवून कारखान्यांना मागील देणी तातडीने द्यावी असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले नुकतेच केले आहे.

गतवर्षीच्या ऊसाला अतिरिक्त प्रती टन १०० रुपये व मागील मागील वर्षीप्रमाणे कामगारांना १८ टक्के बोनस देवून ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांची दिवाळी गोड करणार -आ.काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ या वर्षाच्या व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व यांच्या धर्म पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे, सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, सर्व संलग्न संस्थांचे अध्यक्ष,पदाधिकारी तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,महा व्यवस्थापक सुनील कोल्हे,आसवनी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबा सय्यद, कार्यशाळा व्यवस्थापक दौलतराव चव्हाण,मुख्य अभियंता निवृत्ती गांगुर्डे,मुख्य रसायणतज्ञ सुर्यकांत ताकवणे,आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,केंद्र शासनाने साखर उद्योगाच्या बाबतीत ज्या ज्या वेळी काही चांगले निर्णय घेतले त्या त्या वेळी केंद्र सरकारच्या त्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावर्षी देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ऊसाच्या माध्यमातून होणाऱ्या साखर उत्पादनाचा विचार करून लवकरात लवकर साखर निर्यातीचा निर्णय केंद्र शासनाने घ्यावा.येणे असलेल्या परताव्याबाबत शासनाने सुचविलेल्या मार्गदर्शक प्रणालीनुसार आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करून सर्व अनुदान प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविली आहेत. त्यापैकी एक रुपया देखील केंद्र शासनाने दिलेला नसून त्याचा परिणाम कारखान्याची रोखता व लाभदायकता यावर होवून आर्थिक कोंडी निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली. त्यासाठी हि देणी केंद्र शासनाने लवकरात लवकर द्यावी. कारखान्याला व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत असून याबाबत शेतकऱ्यांचे जेष्ठनेते शरद पवार हे पुढाकार घेवून हा प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्र शासनाने साखरेची किमान विक्री किंमत हि प्रती किलो ३१ रुपये ठरविली असून त्यामध्ये वाढ करण्याची भारतीय कृषी मुल्य आयोगाने शिफारस केलेली असून आजपर्यंत केंद्र शासनाने निर्णय घेतलेला नाही. केंद्र शासनाने मागील वर्षीच्या एफ. आर. पी. मध्ये १०० रुपये वाढ करून १० साखर उताऱ्यासाठी प्रतीटन २ हजार ,८५० व पुढील १ साखर उतऱ्यास प्रतीटन २८५ रुपये दर द्यावा लागणार आहे. मात्र कारखान्याची एफ.आर.पी.कितीही येत असली तरी कारखान्याने यापूर्वी देखील उस दर दिलेला आहे. राज्यातील व जिल्हातील बहुतेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होत असले तरी ऊस दराबाबत जाहीर वाच्यता झालेली नाही. मात्र ज्याप्रमाणे माजी खा. शंकरराव-काळे व माजी आ.अशोक काळे यांनी आजवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासून एफ.आर.पी. पेक्षा जास्त ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवून यावर्षी देखील कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील असा कोणताही भेदभाव न करता सरसकट प्रती टन २ हजार ५०० रुपये पहिली उचल देणार आहे.मागील वर्षी देखील प्रती टन २५०० रुपये दर देवून यावरच थांबणार नसल्याचा शब्द दिला होता.तो आपण पूर्ण केला असल्याचे सांगितले आहे.

यावर्षी कार्यक्षेत्रात ५.२५ लाख मे. टन व कार्यक्षेत्राबाहेर १.२५ मे.टन असे एकून ६.५० लाख टनाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र यावर्षीच्या गळीत हंगामावर कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्वांनी विशेष काळजी घेवून मास्क, सॅनिटायझर व सोशल डीस्टंसिंग चे पालन करून गळीत हंगाम यशस्वी करावा असे आवाहन केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा कार्यक्रम घरबसल्या पाहता यावा यासाठी या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्य्यक्ष सुधाकर रोहोम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Close