जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आदिवासी नागरिकांना खावटी वाटप करा -मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांना शासनाने १०० टक्के खावटी अनुदान मंजूर केले आहे ते त्वरित वाटप करा अशी मागणी कोपरगाव येथील कार्यकर्ते अमित आगलावे यांनी तालुक्याचे आ. आशुतोष काळे यांना निवेदन देऊन केली आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. ९ सप्टेंबर च्या शासन निर्णयानुसार सध्या कोविड विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांयांना मदत देण्यासाठी १०० टक्के रोखीने खावटी कर्ज वाटप मंजूर केले आहे ते या नागरिकांना तातडीने मिळणे गरजेचे आहे-आगलावे

महाराष्ट्र शासनाने दि. ९ सप्टेंबर च्या शासन निर्णयानुसार सध्या कोविड विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांयांना मदत देण्यासाठी १०० टक्के रोखीने खावटी कर्ज वाटप मंजूर केले आहे.ही अनुदानित योजना एक वर्षासाठी (सन-२०२०-२१) मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ पन्नास टक्के रोख व ५० टक्के वस्तू स्वरुपात देण्यात येणार आहे.त्या आदेशानुसार प्रकल्पाधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर तालुका-अकोले यांनी दि.२२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सर्व तालुक्यातील तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना माहिती व या सूचना दिलेल्या आहेत.त्याची अंमलबजावणी काटे कोरपणे करून कोपरगाव तालुक्यातील पात्र शंभर टक्के अनुसूचित जमातीच्या बांधवांना ४ हजार रूपये प्रत्येक पात्र कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी आगलावे यांनी या निवेदनात केली आहे.त्याची प्रत कोपरगावचे तहसीलदार, गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती कोपरगाव यांनाही दिली आहे. तसेच या योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी गावातील ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून घ्यायचा आहे.गेल्या बरेच वर्षापासून ही योजना बंद पडलेली होती. आता आपल्या तालुक्याला चांगले लोकप्रतिनिधी लाभल्याने या योजनेचा शंभर टक्के लाभ आपल्या आदिवासी समाजाला होणार असल्याचा आशावाद अमित आगलावे यांनी व्यक्त केला आहे व कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Close