कोपरगाव तालुका
खा.राऊत यांनी केले कु.चैताली काळे हिच्या कलेचे कौतुक
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील कु.चैताली शंकर काळे या मुलीने अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शालांत परीक्षेत ९५.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल व चित्रकलेत चांगले यश मिळावल्याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी तिच्या कामाचे कौतुक करुन तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
रवंदे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेली दहावीची परिक्षा दिलेली मुलगी कु.चैताली काळे हिला मात्र चित्रकलेचा छंद जडला आहे.या कालावधीत तीने अनेक मान्यवरांचे चित्रे कोणतेही प्रशिक्षण न घेता मुक्तहस्त प्रकारात काढली आहेत.त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही पेन्सिलच्या सहाय्याने हुबेहुब चित्र काढले आहे.तिच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशात लादलेली टाळेबंदी काहींना संधी तर काहींना अडचण वाटली.ज्यांना संधी वाटली त्यांनी आपल्या संधीचे सोने केले आहे.तर ज्यांना अडचण वाटली त्यांनी रडतखडत आपली जीवन नौका चालविण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र रवंदे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेली दहावीची परिक्षा दिलेली मुलगी कु. चैताली काळे हिला मात्र चित्रकलेचा छंद जडला आहे.या कालावधीत तीने अनेक मान्यवरांचे चित्रे कोणतेही प्रशिक्षण न घेता मुक्तहस्त प्रकारात काढली आहेत.त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही पेन्सिलच्या सहाय्याने हुबेहुब चित्र काढले आहे.
याची माहिती कोपरगाव तालुक्यातील मूळ रहिवाशी असलेले शिवसेनेचे संपर्क नेते प्रवीण शिंदे यांनी त्यांना दिली आहे.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कु.चैताली काळे हिच्या कलेचे व हुशारीचे कौतुक करून तिच्याशी हितगुज केले आहे.व तिला मार्गदर्शन केले आहे.तसेच लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.खा.राऊत यांनी तिला शिवसेना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी कु.चैतालीचे पिताश्री शंकर भागूजी काळे हेही उपस्थित होते.खा.राऊत यांनी आपल्या कार्यमग्नतेत असतांनाही वेळ दिल्या बद्दल कु.चैताली काळे व तिच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.