कोपरगाव तालुका
कोळपेवाडीत अल्पबचत गटांना कर्ज वितरण संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांना नुकतेच सहा लाख रुपयांचे कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेचे गौतमनगर शाखेचे शाखाधिकारी सुनील गाडे यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले आहे.
बचत गटाच्या महिलांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने प्रयत्न सुरु असतात. कोरोनाच्या जागतिक साथीमुळे सर्वच आर्थिक क्षेत्राच्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत.मात्र अशा परिस्थितीत पुष्पाताई काळे यांनी बचत गटाच्या महिलांना सहा लाखाचे कर्ज वितरण करून आर्थिक संकटात मदतीचा हात दिला आहे.गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे सभागृह येथे कोपरगाव तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी शाखाधिकारी सुनील गाडे म्हणाले की,
यावेळी शाखाधिकारी सुनील गाडे म्हणाले की, घेतेलेले कर्ज सत्कारणी लावून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा.घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून बँकेकडे आपल्या बचत गटाची पत वाढवावी. यावेळी दत्त सागर,साई अमृत,वैष्णवी मॉ,कृष्णा,सप्तशृंगी व ओम साई आदि बचतगटांना धनादेश देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक जयपाल जाधव,अनिल पवार आदींसह बचत गटाच्या महिला सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होत्या.