कोपरगाव तालुका
मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला न्यायालयाकडून मिळालेली स्थगिती हि अन्यायकारक असून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा यासह अन्य मागण्यासाठी आज “आम्ही मराठा संघटने”च्या वतीने आज कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
सरकारने नुकत्याच काही घोषणा केल्या असल्या तरी त्या फक्त मराठा समाजासाठी नसून इतर खुल्या प्रवर्गांचा त्यात समावेश आहे.मराठा समाजाला घटनेतील अनुच्छेद १५ (४),१६ (४) याप्रमाणे मिळालेले आरक्षण संरक्षित राहावे.तसेच ‘ईडब्ल्यूएस’चे आरक्षण न्यायप्रविष्ट असून त्याचा पर्याय स्वीकारण्याचे पर्याय दिले जात आहेत.त्यामुळे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याबरोबर वस्तुस्थिती मांडण्यासाठी सर्वपक्षीय सरकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.
सरकारने नुकत्याच काही घोषणा केल्या असल्या तरी त्या फक्त मराठा समाजासाठी नसून इतर खुल्या प्रवर्गांचा त्यात समावेश आहे.मराठा समाजाला घटनेतील अनुच्छेद १५ (४),१६ (४) याप्रमाणे मिळालेले आरक्षण संरक्षित राहावे.तसेच ‘ईडब्ल्यूएस’चे आरक्षण न्यायप्रविष्ट असून त्याचा पर्याय स्वीकारण्याचे पर्याय दिले जात आहेत.त्यामुळे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याबरोबर वस्तुस्थिती मांडण्यासाठी सर्वपक्षीय सरकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव तालुक्यात आम्ही मराठा संघटनेच्यावतीने आज कोपरगाव येथील तहसील कार्यालयात आज निवेदन देण्यात आले आहे.
त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया विरुद्ध आव्हान देणारी फेर याचिका दाखल करावी.चालू वर्षांतील शैक्षणिक वर्षात आरक्षणातील जात प्रमाणपत्र, सादर करण्यास मुदतवाढ मिळावी,मराठा समाजाला ओ.बी.सी. समाजाच्या फी रचनेनुसार पन्नास टक्के फी प्रतिपूर्ती योजना लागू करावी,जिल्हा निहाय वसतीगृहाचा भत्ता योजनेतील निधी वाढवावा,समांतर आरक्षणातून अन्याय झालेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळावा व न्यायालयात चुकीची माहिती पुरविणाऱ्या वकिला विरुद्ध कारवाई करावी,अण्णासाहेब पाटील महामंडळाला ओ.बी.सी. धर्तीवर महामंडळ स्थापून त्यास कर्ज वाटपाचे अधिकार द्यावेत,महाराष्ट्र राज्य प्रशासकीय सेवा परिक्षा पुढे ढकलावी,व या समाजाच्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवून ३४ वर्ष करण्यात यावी.स्थगिती पूर्व ज्या निवड प्रकिया पूर्ण झाल्या त्याना त्वरित नियुक्त्या देण्यात याव्या आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आदी विविध मागण्यांचे निवेदन “आम्ही मराठा संघटने”च्या कोपरगाव विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.निवेदनावर विकी पेकळे,मयुर पाचोरे,धनंजय औताडे,मयुर कांडेकर,किरण मोरे,श्रीकांत चतुर या तरुणांनी सह्या केल्या आहेत.निवेदन नायब तहसीलदार योगेश कोतवाल यांनी स्वीकारले आहे.