कोपरगाव तालुका
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंती निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील के.बी.पी.विद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नुकतेच अभिवादन केले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले.पाटील हे आडनाव भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते.त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते.महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता.त्यांचे कार्य जनमानसात प्रसिद्ध झाल्याने त्यांचा आजही सर्वत्र गौरव होत आहे-आ.काळे
भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली.भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करुन मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले.पाटील हे आडनाव भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते.त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते.महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता.त्यांचे कार्य जनमानसात प्रसिद्ध झाल्याने त्यांचा आजही सर्वत्र गौरव होत आहे.त्यांच्या जयंती निमित्त रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले आहे.त्यावेळी त्यांनी आपण या थोर विचारांपासून प्रेरणा घेत असून त्या विचारांवर आपला विश्वास असल्याचे प्रतिपादन केले आहे.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचे प्राचार्य शंकरराव थोपटे,के.बी.पी.विद्यालयाचे प्राचार्य विश्वास काकळीज,सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सुरवसे,मुख्याध्यापक सुभाष दरेकर,आप्पासाहेब आव्हाड,रयत बँकेच्या संचालिका सुनीता वाबळे,संतोष पेटकर,बाळासाहेब निर्मळ,काशीनाथ लव्हाटे,नरेंद्र ठाकरे,शहाजी सातव आदी उपस्थित होते.