कोपरगाव तालुका
कोपरगावात गतिरोधकावर अपघात,महिला ठार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा येथील रहिवाशी महिला व त्यांचा मुलगा हे आपल्या दुचाकीवरून रात्री १०.४० वाजेच्या सुमारास आपल्या घरी जात असताना कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील खंदकनाला येथे गतिरोधकावर सदर महिलेचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात संगीता ज्ञानेश्वर बनकर (वय-६२) हि महिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन झालेल्या अपघातात त्यांच्यावर शिर्डी येथील साई संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरु आसताना निधन झाले असल्याची नोंद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा साडे अकराच्या सुमारास दाखल झाली आहे.
मयत महिला संगीता बनकर या आपल्या मुलाच्या दुचाकीवरून मंगळवार दि.१५ सप्टेंबर रोजी रात्री १०.४० पूर्वी आपले काम आटोपून आपल्या घरी टाकळी फाटा येथे जात असताना शहरातील नगरपरिषद हद्दीत खंदक नाला या ठिकाणी असलेल्या गतीरोधकावर त्यांची गाडी आदळून झालेल्या अपघातात त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्याचा अपघात होऊन त्यात त्या गंभीर जखमी होऊन त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व त्यात गंभिर जखमी होऊन निधन झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत महिला संगीता बनकर या आपल्या मुलाच्या दुचाकीवरून मंगळवार दि.१५ सप्टेंबर रोजी रात्री १०.४० पूर्वी आपले काम आटोपून आपल्या घरी टाकळी फाटा येथे जात असताना शहरातील नगरपरिषद हद्दीत खंदक नाला या ठिकाणी असलेल्या गतीरोधकावर त्यांची गाडी आदळून झालेल्या अपघातात त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्याचा अपघात होऊन त्यात त्या गंभीर जखमी होऊन त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यांना नजीकच्या नागरिकांनी प्रथम कोपरगावात खाजगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र दुखापत गंभीर असल्याने त्याना येथिल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यानां प्रथम आत्मा मालिक रुग्णालयात व नंतर शिर्डी येथे रवाना केले होते.त्याना तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे.त्यांचे शव विच्छेदन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.त्याची खबर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यू दप्तर नोंद क्रं.३७/२०२० द.प्र.सं.क.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.