कोपरगाव तालुका
शिरसगावात आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वाटप संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कुल तर्फे एल. के.जी.ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाचा विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून म्हणून “आर्सेनिक अल्बम-३०” या होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. शाळेत जास्त गर्दी होवू नये.व सुरक्षित अंतराचा नियम पाळून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
वर्तमान काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे नगर जिल्ह्यात जवळपास २१ हजार ०९१ नागरिकांना कोरोनाची लागण होऊन त्यात २९८ रुग्णांचा बळी गेला आहे तर कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत अठरा नागरिकांचे बळी गेले आहेत.त्यामुळे या साथीला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरले आहे.या पार्श्वभूमीवर “आर्सेनिक अल्बम-३०” या गोळ्याची माणसाची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष्य मंत्रालयाने शिफारस केली आहे त्यामुळे या गोळ्याचा सर्वत्र बोलबाला आहे.
वर्तमान काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे नगर जिल्ह्यात जवळपास २१ हजार ०९१ नागरिकांना कोरोनाची लागण होऊन त्यात २९८ रुग्णांचा बळी गेला आहे तर कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत अठरा नागरिकांचे बळी गेले आहेत.त्यामुळे या साथीला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरले आहे.या पार्श्वभूमीवर “आर्सेनिक अल्बम-३०” या गोळ्याची माणसाची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष्य मंत्रालयाने शिफारस केली आहे त्यामुळे या गोळ्याचा सर्वत्र बोलबाला आहे.या पार्श्वभूमीवर शिरसगाव ग्रापमपंचायत हद्दीत असलेल्या श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कुलचे संस्थापक केशवराव भवर यांनी या रोगप्रतिकारक गोळ्यांचे महत्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले की,” दररोज सकाळी उपाशी पोटी ४ गोळ्या सलग तीन दिवस घेणे गरजेचे आहे.यानंतर प्रत्येक आठवड्याला ४ गोळ्या एकावेळी घेणे आवश्यक आहे.या गोळ्यांना हात न लावता झाकणात घेऊन तोंडात टाकाव्या व गोळ्या चघळून खाव्यात.गोळ्या घेतल्यानंतर ३० मिनिटे काहीच खावू-पीऊं नये.गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाही.असे आवाहन केले आहे.
एका विद्यार्थ्यांचे पालक व्यंकटेश धट यांनी शाळेस ५ हजार रुपयांची मदत देवू केली.यांचे ही संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.यावेळी श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक केशवराव भवर,संचालक स्वप्निल भवर,प्राचार्य दीपक चौधरी,अमोल गायकवाड,विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.