जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महावितरण कंपनीची मोठी चोरी,दोन आरोपी अटक,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकमठाण येथील रहिवासी असलेले आरोपी भरत दिपक लोहकणे (वय-४२) व मुनिर हुसेन सय्यद (वय-४८) आदींनीं समृद्धी महामार्गावरील पुलाजवळील महावितरण कंपनीचे ०१ लाख २९ हजार ४०० रुपये किमतीचे विद्युत रोहित्र खाली पाडुन त्यातील किमती ऑइल,तांबे,व केबल चोरून नेल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी अटक केली असून त्यांना कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हयात आरोपीनी स्थानिक एका इसमाचा ट्रॅक्टर वापरून सदर तीनशे फूट लांबीची केबल ओढून काढली होती.मात्र त्यात सदर गुन्ह्यात ट्रॅक्टरचा अद्याप उल्लेख आला नसल्याने नसल्याने कोकमठाण आणि परिसरातील ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.यात चौकशी बाकी असल्याने ते पुढे उघड होईल असेही ग्रामस्थांना वाटत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्य सरकारचा सुमारे ५६ हजार कोटी रुपयांचा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार होत असून या प्रकल्पात ५० हून अधिक उड्डाणपूल आणि २४ हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत. या खेरीज या मार्गावर ५ पेक्षा जास्त बोगदे,वाहनांसाठी महामार्गाच्या खालून जाणारे ४०० हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३०० हून अधिक भुयारी मार्ग अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येत आहेत.कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे.त्यात कोकमठाण येथे एक छेद मार्ग बांधण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यांचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.११ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात केला आहे.उर्वरित शिर्डी ते घोटी या ८० कि.मी.मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याने काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे लोकार्पण या मार्च महिन्याच्या अंतिम चरणात संपन्न होत आहे.त्यासाठी कामाने वेग घेतला आहे.त्या साठी जागोजागी त्यांनी छेद मार्गावर विजेची सोय केली असून महानगरा प्रमाणे छेदमार्गाच्या ठिकाणी महावितरण कंपनीकडून घेऊन वीज वापरली आहे.त्यासाठी जागोजागी विद्युत रोहित्र उभारले आहे.त्यासाठी जमिनीखालून केबल घेऊन आपल्या विजेची गरज भागवली आहे.त्या रोहित्रांवर व केबलवर चोरट्यांची वक्रदृष्टी झाली असून त्यांनी कोपरगाव नजीक छेद मार्गाजवळ असलेल्या पुलाच्या जवळ असलेल्या विद्युत रोहित्राला (क्रं.४२१०८३३) खाली पाडून त्यातील ऑइल,तांबे,व पुलाखालून जाणारी केबल आदींवर दि.२७ फेब्रुवारी रोजी रात्री कधीतरी डल्ला मारला असल्याची बाब महावितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात आली होती.त्यात १० हजार ५०० किमतीचे ९५ लिटर ऑइल,२१ हजार रुपये किमतीचे त्यातील तांबे,तर या शिवाय ९७ हजार ९०० रुपये किमतीची ३०० फूट केबल असा एकूण ०१ लाख २९ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

दरम्यान तेथील महावितरण कंपनीचे कोपरगाव येथील सहाय्यक अभियंता यज्ञेश महेंद्र शेलार (वय-२८) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.९९/२०२३ भा.विद्युत कायदा अधिनियम कलम १३६ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करित होते.
दरम्यान कोपरगाव शहर पोलीस या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधात असताना त्यांना गुप्त खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की,सदर गुन्हा त्याच कोकमठाण कारवाडी येथील आरोपी भरत दिपक लोहकणे व मुनिर हुसेन सय्यद आदींनीं केला आहे.त्यांनी या प्रकरणी या आरोपीना दि.०३ मार्च रोजी अटक केली होती.त्यांनी आधी ताब्यात घेतल्यावर काही नखरे करुन पाहिले मात्र पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता ते पोपटाप्रमाणे बोलू लागले असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.तथापि त्यातील रोहित्र ऑइल,त्यातील तांबे आदी ऐवज मात्र हस्तगत करायचा बाकी आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी त्यांच्या कडील ९७ हजार ९०० किमतीचे १८५ लांबीची त्यांनी तोडलेली केबल मात्र जप्त केली आहे.व त्यांना आज दुपारी तिनच्या सुमारास कोपरगाव येथील जिल्हा व सर्वत्र न्यायालयाचे समोर हजर केले असता जिल्हा व सत्र न्या.संभाजी पाटील यांच्या न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हयात आरोपीनी स्थानिक एका इसमाचा ट्रॅक्टर वापरून सदर तीनशे फूट लांबीची केबल ओढून काढली होती.मात्र त्यात सदर गुन्ह्यात ट्रॅक्टरचा अद्याप उल्लेख आला नसल्याने नसल्याने कोकमठाण आणि परिसरातील ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close