कोपरगाव तालुका
टाळेबंदी काळातील वीजबिल माफ करा-मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महावितरण कंपनीने राज्यात सरकारने जाहीर केलेल्या टाळेबंदी काळातील विद्युत ग्राहकांची तीन महिन्याची वीजबिल माफ करावे अशी मागणी कोपरगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतीच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडॆ निवेदन देऊन केली आहे.
राज्यात सरकारने दि.२४ मार्च रोजी पहिली टाळेबंदी राज्यात जाहीर केली.त्यामुळे नागरिकांना सलग तीन महिने आपल्या घरात कोंडून घ्यावे लागले.परिणाम स्वरूप नागरिकांच्या रिकाम्या हातांना काम नव्हते त्यामुळे हातातोंडाची गाठ पडणे अवघड गेले.अशातच महावितरण कंपनीने टाळेबंदी उठल्या-उठल्या अव्वाच्या सव्वा बिले वीज ग्राहकांच्या हातावर ठेऊन आपले दात दाखविण्यास सुरुवात केली. त्यामुळे सामान्य वीज ग्राहक हादरून गेले आहे.
राज्यात सरकारने दि.२४ मार्च रोजी पहिली टाळेबंदी राज्यात जाहीर केली.त्यामुळे नागरिकांना सलग तीन महिने आपल्या घरात कोंडून घ्यावे लागले.परिणाम स्वरूप नागरिकांच्या रिकाम्या हातांना काम नव्हते त्यामुळे हातातोंडाची गाठ पडणे अवघड गेले.अशातच महावितरण कंपनीने टाळेबंदी उठल्या-उठल्या अव्वाच्या सव्वा बिले वीज ग्राहकांच्या हातावर ठेऊन आपले दात दाखविण्यास सुरुवात केली. त्यामुळे सामान्य वीज ग्राहक हादरून गेले आहे.अनेकांना शंभर-दोनशे रुपये येणारे बिल दोन हजारा पासून साडेचार हजारापर्यंत देण्याचे धाडस महावितरण कंपनीने केले आहे.त्यामुले हे वीज ग्राहक हबकून गेले आहे.महिलांसह अनेकांनी लागलीच महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली मात्र तेथे त्यांना अंगठा दाखवला गेला आहे.त्यांना सरासरी बिले दिले गेल्याची बतावणी केली गेली आहे.या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कोपरगाव शहर मनसे व जिल्हा मनसेचे उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना ई मेल वर निवेदन पाठवून त्याची प्रत आज सकाळी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिली आहे.त्यात त्यांनी वीज वितरण कंपनीने संपूर्ण टाळेबंदी काळातील तीन महिन्यांचे वीज बील माफ करावे तसेच दिल्ली सरकारच्या धर्तीवर २०० युनिट पर्यन्त प्रत्येकाला माफ करुन त्यापुढे बील आकारावे आदी मागण्या केल्या आहेत.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,मनसे शहराध्यक्ष अध्यक्ष अनिल गायकवाड,मनसे तालुकाध्यक्ष सुनील फंड, मनसे जेष्ठ कार्यकर्ते योगेश गंगवाल,दिव्यांग सेना अध्यक्ष रोहीत एरंडे,मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष आदी मान्यवरांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.