जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरंगाव नजीक..या परिसरात बिबट्या !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

धारणगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी येथील चव्हाण वस्तीजवळ दादासाहेब चव्हाण हे सोमवारी रात्री नऊ वाजता औषधालय बंद करून घरी आले असताना त्यांना आपल्या घराच्या परिसरात बिबट्या आपल्या गायांच्या गोठ्याजवळ दिसल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यांनी आरडा-ओरडा करताच त्याने चव्हाण वस्ती वरचे ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेतल्याने त्याने पोबारा केला आहे.

उन्हाळा असल्याने आपापली बरीच पिके काढून घेतली गेली आहे.तरीही कुंभारी परिसरात बिबट्या आढल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.ग्रामस्थांनी या नंतर विजेरी व ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र मध्ये बराच वेळ निघून गेल्याने घोटाळा झाला.ग्रामस्थांना घटनास्थळी बिबट्यांच्या पायाचे ठसे दिसले.त्या मुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उन्हाळा असल्याने आपापली बरीच पिके काढून घेतली गेली आहे.तरीही कुंभारी परिसरात बिबट्या आढल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.ग्रामस्थांनी या नंतर विजेरी व ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र मध्ये बराच वेळ निघून गेल्याने घोटाळा झाला.ग्रामस्थांना घटनास्थळी बिबट्यांच्या पायाचे ठसे दिसले.त्या मुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा संचार करत असल्याने येथील नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे अवघड झाले आहे.बिबट्यां दिसल्याची माहीती मिळताच वनविभागाचे श्री सांगळे यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता येऊन घटनास्थळाची पाहणी केली.त्यानंतर त्यांनी ठसे ओळखून त्यास दुजोरा दिला आहे.त्यांनी चव्हाण वस्ती वरच्या ग्रामस्थांना दिलासा देत या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close