कोपरगाव तालुका
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची..यांनी केली पाहणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव मतदारसंघातील रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,शहापूर,मंजूर,धारणगाव,येसगाव,खोपडी, कोकमठाण,पुणतांबा आदी गावच्या पाणीपुरवठा योजनांची पाहणी केली आहे.
यावेळी आ.आशुतोष काळे यांनी काम सुरू असलेल्या योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या व कामामध्ये येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रखडलेल्या धारणगाव व ५ गावे पाणीपुरवठा योजनेच्या इतर परवानग्या मिळवून काम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगितले आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, संचालक, सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, ठेकेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.आहिरे,जिल्हा परिषदेचे यांत्रिकी उपअभियंता बिरासदार, ग्रामस्थ, स्थानिक कार्यकर्ते आदी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.