कोपरगाव तालुका
कोपरगावात आणखी एक संशयित ताब्यात ?
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यात दोन कोरोना बळी गेले असताना गेले पंधरा दिवस एकही रुग्ण आढळला नव्हता मात्र महिला महाविद्यालया नजीक रहिवासी असलेल्या व आपले पिताश्री येवला येथे ये-जा करत असलेल्या तरूंणाला संशयास्पद म्हणून काल सांयकाळी उशिरा आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन त्यास तपासणीस पुढे पाठविण्यात आल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विश्वसनिय माहिती हाती आली आहे.कोपरगाव शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणांना आरोग्य विभागाने काल दुपारी ताब्यात घेऊन संशयित म्हणून तपासनीस पाठवले होते.तर पूर्व सुरक्षा म्हणून जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले असताना काल सायंकाळच्या सुमारास या तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे.या तरुणांचे वडील आपल्या कामासाठी येवला येथे नेहमी ये-जा करत असतात.दोन्हीही अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही.त्यामुळे तालुक्यात व शहरात नागरिकांत संभ्रम पसरला आहे.या बाबत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दुजोरा दिला आहे.