कोपरगाव तालुका
टाकळीत दोन गटात तुंबळ हाणामारी,अठरा जणांविरुद्ध गुन्हा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत कोपरगाव शहर पोलिसानी अठरा जणाविरुद्ध योगेश दत्तू बोर्डे व जना रानोबा देवकर या दोघांच्या गटात काल झालेल्या हाणामारीचा आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या अठरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे टाकळी परिसरात खळबळ उडाली आहे.
वर्तमानात देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे.हि संख्या वाढतच चालली आहे.त्या मुळे प्रशासन तणावात आहे.त्यातच नागरिक अद्यापही काही सर्वसाधारण नियम पाळत नाही त्यासाठी पोलीस प्रशासन वारंवार सूचना देऊनही नागरिकांनावर अपेक्षित परिणाम होताना दिसत नाही.त्यामुळे प्रशासन वैतागलेले आहे.कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे दोन बळी आधीच गेले आहे.आता परिस्थिती नियंत्रणात दिसत असली तरी येवला हे कोरोना बाधित शहर ठरल्याने नागरिक पोलीस यांना डोळ्यात तेल घालून या साथीत काम करावे लागणार आहे.या पार्श्वभूमीवर टाकळी ग्रामपंचायत हद्दीत काल आदिवासी व बहुजन समाज आदी दोन गटात रस्त्याचा वाद आहे.त्यावरून काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वाद झाला होता मात्र तो वाद स्थानिक नागरिकांनी मिटवला होता.तथापि फर्यादी