जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

घरावरील वीज तारा बाजूस घेण्यासाठी ५० हजारांची मागणी,अधिकाऱ्यांस संरक्षण !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तहसिल कार्यालयात आज आयोजित केलेल्या जनता दरबारात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाकली रोड वरील एका महिलेच्या घरावरील वीज तारा बाजूला घेण्यासाठी तब्बल ५० हजारांची लाच मागीतल्याचे प्रकरण उघड झाले असून त्यात तक्रारदार महिला आणि तिच्या मुलाला न्याय देण्याऐवजी महावितरण कंपनीचे संगमनेर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक इंगळे यांनी महावितरण कंपनीत काम करणाऱ्या तिच्या मुलाला,”चोर उलटा फौजदार को डांटे” या आविर्भावात दटावल्याने त्याच्या सभागृहात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून त्याची दखल घेत आ.आशुतोष काळे यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबाराची निवडक विभागाची वेळोवेळी झाडाझडती सुरू केल्याने मतदार संघातील अधिकाऱ्यांना घाम फुटला असून जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने व जनतेला न्याय मिळत असल्याचे कोपरगाव तालुक्यातील मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

   कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महावितरण,राज्य परिवहन महामंडळ,रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागा संदर्भात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी दुपारी ०२ वाजता तहसील कार्यालय,कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्यावेळी हा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

  

दरम्यान या जनता दरबारात सत्ताधारी वर्गाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिस आणि महावितरण विरुध्द तक्रारींचा मोठा सुर लावल्याने अधिकारी किती बेताल झाले आहे ही बाब उघड झाली असल्याने अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे मोठे आव्हान आ.आशुतोष काळे यांचेसमोर निर्माण झाले असल्याचे उघड झाले आहे.

  सदर प्रसंगी युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर,गौतम बँकेचे अध्यक्ष संजय आगवण,तालुका पोलिस निरीक्षक संदीप कोळी,काळे कारखान्याचे माजी सुधाकर रोहोम,बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र निकोले,कापूस जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार,शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे,राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता संगमनेर विनायक इंगळे,महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड,राहाता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता धांडे,सचिन बेंडकुळे,कोपरगाव आगार प्रमुख अमोल बनकर आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना,संलग्न संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

दरम्यान शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका निभावणारी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना-२ चे काम जवळकेसह तालुक्यात रेंगाळले असल्याची बाब शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे यांनी लक्षात आणून दिली आहे.त्यात महावितरण आणि महसूल विभागाचा कोणाला कोणाचा ताळमेळ नसल्याचे सांगून त्यात लवकरच गती देण्याची मागणी केली आहे.महावितरण कंपनीचे सर्व बिले माफ केल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे करत आहेत.मात्र वास्तव विपरीत असल्याचे उघड झाले आहे.

   सदर जनता दरबाराचे प्रास्तविक महावितरण कोपरगाव येथील विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.राठोड यांनी केले आहे.त्यानंतर या जनता दरबाराची सुरुवात झाली होती.त्यात यांनी विद्युत रोहित्र शेतकऱ्यांना घेताना कोणी रक्कम मागत असेल तर तक्रार करा असे आवाहन केल्यावर या तक्रारींचा भडका उडाला होता.त्यात गंभीर बाब उघड झाली आहे.त्यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता इंगळे व ज्याने दहा हजारांची लाच मागितली त्या अभियंता खंदारे यांनी बडतर्फ करा अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

    सदर प्रसंगी महावितरण कंपनीच्या कारभाराचे वाभाडे उपस्थित शेतकऱ्यांनी काढले असून त्यात राजेंद्र खीलारी यांचे सह शेतकरी गोरक्षनाथ जामदार,संजय आगवन,महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली आभाळे,मंजूर येथील अशोक तुकाराम,राजेंद्र देशमुख,स्मिता शिलेदार,रमेश धीवर,शंकर पुंजाजी जावळे,प्रशांत वाबळे,दत्तात्रय शिंदे आदींनी महावितरण कंपनी विद्युत रोहित्रांसाठी राजरोस शेतकऱ्याची लूट करत असल्याची बाब उघड झाली आहे त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठी टीकेची झोड उठवली होती.त्यात तालुक्यात वांरवार होणारी व शेतकऱ्यांना चीड आणणारी विद्युत पंपाची चोरी हा विषय पोलिस अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करण्यात आला व सदर चोरटे पकडण्याची मागणी करण्यात आली आहे.त्यावेळी संतप्त आ.काळे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले चोरट्यांचा तपास करण्याच्या सूचना केल्या आहे.

  दरम्यान शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका निभावणारी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना-२ चे काम जवळकेसह तालुक्यात रेंगाळले असल्याची बाब शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे यांनी लक्षात आणून दिली आहे.त्यात महावितरण आणि महसूल विभागाचा कोणाला कोणाचा ताळमेळ नसल्याचे सांगून त्यात लवकरच गती देण्याची मागणी केली आहे.महावितरण कंपनीचे सर्व बिले माफ केल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे करत आहेत.मात्र जमीन पातळीवर मात्र वास्तव वेगळे असून शेतकऱ्यांकडून राजरोस वीज बिलाची वसुली सुरू असल्याचा आरोप त्यानी केला आहे.त्यावर अधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणी केली आहे.त्यावर महावितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी बी.डी.पाटील यांनी सदर बिल हे सन-२०२५ ते आगामी २०२९ पर्यंत माफ केल्याची माहिती उघड झाली आहे.त्यामुळे राज्यातील मंत्र्यांनी केलेली घोषणा फसवी असल्याचे वास्तव उघड झाले आहे.

   सदर प्रसंगी घरगुती वीज ग्राहकांना वेळेवर बिले पोहच केली जात नसून विजेचे रीडिंग वेळेवर घेतली जात नसल्याने वीज ग्राहकांना त्याचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत असल्याची बाब माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी उघड केली असता अतिरिक्त कार्यकारी अभियंता इंगळे यांनी ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी पुन्हा ग्राहकांनी तक्रारी कराव्या असे उलट आवाहन केले आहे.त्यावर मोठा गदारोळ झाला आहे.त्यात पुन्हा एकदा सदर भ्रष्ट अधिकारी ठेकेदार व त्यांच्या पित्यांना अभय देत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.त्यामुळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता इंगळे हे ग्राहक राजा असलेल्या वीज ग्राहकांचे काम करतात की ग्राहकांची लूट करणाऱ्यांसाठी काम करतात असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांना मागणी करून तीन तीन वर्षे झाली तर वीज जोडणी मिळत नसल्याची बाब राजेंद्र खिलारी यांनी उघड केली आहे.सौर ऊर्जेसाठी सातबारा देऊनही शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे.एकाच शेतकऱ्यांना तीन ठिकाणी क्षेत्र असेल तर त्याला वीज जोडणी मिळत नाही,त्यामुळे वीज जोडणी नसलेल्यांना सौर पंप अनुदानावर दिला जात आहे.मात्र ते शेतकरी तुलनेने फार कमी असून सर्व शेतकऱ्यांना सौर पंप दिले जावे अशी रास्त मागणी राजेंद्र खिलारी यांनी केली आहे.त्यावेळी आ.काळे यांनी सदर बाब राज्याची धोरणात्मक असल्याचे त्याबाबत आपण विधानभवनात मागणी केली जाईल असे आश्वासन दिले आहे.त्यावेळी पोलिस ठाण्याच्या बाबत नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला आहे.त्याबाबत सविस्तर माहिती उद्या दिली जाणार आहे.

   दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबाराची निवडक विभागाची वेळोवेळी झाडाझडती सुरू केल्याने मतदार संघातील अधिकाऱ्यांना घाम फुटला असून जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने व जनतेला न्याय मिळत असल्याचे कोपरगाव तालुक्यातील मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.त्याबद्दल त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.


  दरम्यान या जनता दरबारात सत्ताधारी वर्गाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तक्रारींचा मोठा सुर लावल्याने अधिकारी किती बेताल झाले आहे ही बाब उघड झाली असल्याने अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे मोठे आव्हान आ.आशुतोष काळे यांचेसमोर आणि कोपगाव मतदार संघात निर्माण झाले असल्याचे उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close