जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या गावाच्या विकासासाठी प्रथमच मोठा निधी – माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

     कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांप्रमाणे धामोरी गावचे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते हे विकासाचे प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी सोडविले असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या कार्यकाळात धामोरीच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्याचा दावा धामोरी ग्रामस्थांनी केला असल्याची माहिती आ.काळे यांच्या कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.

   

“धामोरीतील रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी देऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देर्डे फाटा-मोर्विस (सात मोऱ्या) रस्ता पूर्ण झाला आहे परिणामी या परिसरातील गावांना लासलगाव,विंचूर,बसवंत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीस घेवून जाण्यासाठी येणारी रस्त्याची अडचण दूर झाली आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

धामोरी येथे आ.आशुतोष काळे यांनी विविध विकासकामांची पाहणी करून शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व विकास कामांबाबत याप्रसंगी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी नागरिकांनी आपल्या भावना आ.काळेंकडे व्यक्त केल्या असल्याची माहिती आहे.

    सदर प्रसंगी पुढे  बोलताना ते म्हणाले की,”मतदार संघाच्या विकासासाठी आणलेल्या निधीचा आकडा साडे तीन हजार कोटीवर पोहोचला आहे.यापुढील काळात त्यामध्ये अधिकची भर पडणार असून मतदार संघात जी काही विकासकामे शिल्लक आहेत त्या कामांना देखील निधी मिळून हि कामे पूर्ण करणार आहे.धामोरी ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा पूल,ज्या पुलामुळे धामोरी गावचा चासनळी परिसराशी संपर्क तुटत होता व कोपरगाव चास नळी वाहतूक बंद होत होती.त्या प्रजिमा-४ वरील धामोरी येथील गोई नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे.तसेच धामोरी गावातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध दिला आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देर्डे फाटा-मोर्विस (सात मोऱ्या) रस्ता देखील पूर्ण झाला आहे.त्यामुळे चासनळी,मोर्वीस,वडगाव,बक्त्तरपूर,हंडेवाडी आदी गावातील नागरिकांना कोपरगावला जाण्यासाठी व धामोरी,मायगाव देवी व तसेच मोठी लोकसंख्या असलेल्या सांगवी भुसारच्या नागरिकांना चासनळी येथे जाण्यासाठी व लासलगाव,विंचूर,बसवंत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीला घेवून जाण्यासाठी येणारी रस्त्याची अडचण दूर झालीआहे असा दावा त्यांनी केला आहे व उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण होतील असे आश्वासन दिले आहे.त्याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close