जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…’ या’ तालुक्यात ३०० कोटीच्या कामांचे होणार भूमिपूजन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


   कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आ.अशोक काळे यांचा ७१ वा अभीष्टचिंतन सोहळा व ३०० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवार दि.२१ ऑगस्ट रोजी संपन्न होणार असल्याची माहिती माजी हाती आली आहे.

       

     महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जल जीवन मिशन अंतर्गत १६५.५० कोटीच्या कामाचे भूमिपूजन,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते, पूल, तीर्थक्षेत्र व उपजिल्हा रुग्णालय मुख्य इमारत भूमिपूजन एकूण (६०.८२ कोटी),मृद व जलसंधारण विभागाचे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत खोलीकरण,रुंदीकरण कामे (५.३० कोटी), नगर विकास विभाग कोपरगाव शहरातील हद्दवाढ भागातील विकास कामे (१० कोटी) आदींसह नानाविध कामांचे उद्घाटन संपन्न होत आहे.

   कर्मवीर शंकरराव काळे यांच्यानंतर आ.अशोक काळे हे सन – 2004 साली प्रथम अटीतटीच्या निवडणुकीत मोठया मताधिक्याने निवडून आले होते.त्यांनी आपल्या कार्य काळात अनेक रस्ते व विविध कामे मार्गी लावले होते.त्यात गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी सेतू तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास राज्यमंत्री के.एच.मुनी अप्पा यांच्या सहकार्याने उभारून दळणवळणाचा महत्वाचा प्रश्न सोडविला होता.यामध्ये प्रामुख्याने कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर चासनळी,धारणगाव-कुंभारी,कोपरगाव शहरातील अ.नगर-मनमाड महामार्गावरील समांतर पूल तसेच कोपरगाव शहर आणि बेट भागाला जोडणारा पूल आदी पूल बांधले.तसेच तहसील कार्यालय,न्यायालय,ग्रामीण रुग्णालय, पशु चिकित्सालय,औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी शासकीय इमारती बांधल्या.यामध्ये धारणगाव-कुंभारी पुलामुळे कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग कोपरगावला कायमचा जोडला जावून कोपरगाव शहराची बाजारपेठेला उर्जित अवस्था आणली असे मानले जात आहे.

   यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जल जीवन मिशन अंतर्गत १६५.५० कोटीच्या कामाचे भूमिपूजन,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते, पूल, तीर्थक्षेत्र व उपजिल्हा रुग्णालय मुख्य इमारत भूमिपूजन एकूण (६०.८२ कोटी),मृद व जलसंधारण विभागाचे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत खोलीकरण,रुंदीकरण कामे (५.३० कोटी), नगर विकास विभाग कोपरगाव शहरातील हद्दवाढ भागातील विकास कामे (१० कोटी), ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -२ जिल्हा वार्षिक योजना रस्ता दर्जोन्नती, रा.मा.६५ (बहादरपूर) ते रांजणगाव देशमुख रस्ता (४.१२ कोटी),जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गोदावरी डावा कालवा (१३ कोटी) व उजवा कालवा (३.२७ कोटी) १६.२७ कोटी निधीतून पाईप मोऱ्या बांधकाम करणे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोपरगाव आगार इमारत पुनर्बांधणी व व्यापारी संकुल उभारणे (१०.९२ कोटी), महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे ब्राम्हणगाव येथील सबस्टेशन लोकार्पण करणे(४.५० कोटी) आदी ३०० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी ऑनलाईन पद्धतीने या कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

   त्यासाठी माजी मंत्री आ.शंकरराव गडाख,माजी.आ.भानुदास मुरकुटे,माजी.आ.नरेंद्र घुले,आ.माणिकराव कोकाटे माजी.आ.चंद्रशेखर घुले,आ.किशोर दराडे,आ.किरण लहामटे,आ.संग्राम जगताप आदी मान्यवरांसह जिल्ह्यासह राज्यातील सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आ.अशोकदादा काळे मित्र मंडळाचे वतीने शेवटी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close