जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पशुधन व पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव भरून द्या- मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी) 

धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे विविध धरणातून जायकवाडीला मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.परंतु कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पर्जन्यमान न झाल्यामुळे अजूनही कित्येक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून सुरु असलेल्या पूर पाण्यातून कोपरगाव मतदार संघातील पशुधनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी गाव तलाव,पाझर तलाव व बंधारे भरून द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.

  

“नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात जवळपास ५४,००० क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे.तसेच त्यामुळे गोदावरी आणि प्रवरा नदीला पूर आला असला तरी अद्यापही कायमस्वरूपी पर्जन्यछायेखाली असलेल्या कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नसल्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असल्याने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पाझर तलाव पशुधन आणि पिण्याच्या पाण्यासाठी भरणे गरजेचे आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   “वर्तमानात राज्यात मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या दमदार पावसाची हजेरी लागली आहे.अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पावसाने राज्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढलाय.आज राज्यातील एकूण धरणे 62.89% भरली आहेत.नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरण आणि बंधाऱ्यांमधून आज सकाळपासून विसर्ग सुरू आहे.परिणामी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी जाणार आहे.नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात जवळपास ५४,००० क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे.तसेच निळवंडे धरणातून देखील ३०,००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.त्यामुळे गोदावरी आणि प्रवरा नदीला पूर आला असला तरी अद्यापही कायमस्वरूपी पर्जन्यछायेखाली असलेल्या कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नसल्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.प्रत्येक गावाची लोकसंख्या दोन ते ते तीन हजाराच्या वर आहे.त्यामुळे बहुतांश गावात आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून नागरीकांच्या व पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व पशुधनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.हि अडचण दूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गोदावरी उजवा तट कालवा,गोदावरी डावा तट कालवा व पालखेड डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदार संघातील कालव्यावर आधारित असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याकरिता गाव तलाव,पाझर तलाव व बंधारे भरून द्यावेत अशा सूचना आ.काळे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे संभाजी नगर येथील कार्यकारी संचालक यांना केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close