जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेकडे साठवण तलावासाठी ३७.१८ कोटी निधी वर्ग-माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या ५ नंबर साठवण तलावाच्या कामासाठी ३७.१८ कोटी निधी कोपरगाव नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आला असून साठवण तलावाच्या सुरु असलेल्या कामाला वेग मिळणार असल्याची  माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

  

“गत वर्षी कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करून आज मितीला या साठवण तलावाचे काम ७० टक्क्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहे.या साठवण तलावाच्या कामासाठी मंजूर निधी वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न सुरु असून मंजूर असलेल्या १३१.२४ कोटी निधीतून ३७.१८ कोटी निधी कोपरगाव नगरपरिषकडे वर्ग करण्यात आला आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगावकरांना पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोपरगावकरांना आश्वासित करून त्यादृष्टीने पाठपुरावा करून आ. काळे यांनी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी तब्बल १३१.२४ कोटी निधी आणला आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करतांना हा प्रश्न तडीस लावला आहे.निवडून येताच तिसऱ्याच महिन्यात समस्त कोपरगावकरांच्या उपस्थितीत ५ नंबर साठवण तलावाचे भूमिपूजन केले होते.

दरम्यान ५ नंबर साठवण तलावाच्या कामात ज्या वेळी अडचणी निर्माण झाल्या त्यावेळी आ.काळे यांनी या अडचणी दूर करून साठवण तलावाचे काम सुरु ठेवले असल्याचा दावा केला आहे.मागील वर्षी कोपरगाव शहरातील हजारो महिलांच्या साक्षीने कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करून आज मितीला या साठवण तलावाचे काम ७० टक्क्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहे.या साठवण तलावाच्या कामात कुठेही अडचणी निर्माण होणार नाही व साठवण तलावाचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू न देता या साठवण तलावाच्या कामासाठी मंजूर निधी वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न सुरु असून मंजूर असलेल्या १३१.२४ कोटी निधीतून ३७.१८ कोटी निधी कोपरगाव नगरपरिषकडे वर्ग  करण्यात आला आहे.त्यामुळे या कामाची गती अजून वाढणार असून लवकरात काम पूर्ण होवून कोपरगावकरांना नियमित स्वच्छ पाणी मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close