कोपरगाव तालुका
आगामी काळात मतदार संघाचा खरा विकास दिसणार-…या आमदारांची माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावांना मागील साडे चार वर्षात विकासाच्या प्रवाहात आणले असले तरी हा विकास रस्ते,पाणी, आरोग्य,वीज आदींचा अनुशेष भरण्यात खर्ची पडला असल्याने आगामी काळात खरा विकास दिसणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील न.पा.वाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत प्रजिमा ८८ च्या न.पा.वाडी ते पुणतांबा रस्ता या रस्त्याचे ५.२० कोटी निधीतून भूमिपूजन,ग्रामपंचायत अंतर्गत १.३० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण,२५१५ अंतर्गत २५ लक्ष निधीतून करण्यात आलेल्या बाळकृष्ण वहाडणे घर ते भरत रहाणे घर डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण, तीर्थक्षेत्र विकास निधीतून पुणतांबा येथील श्री क्षेत्र चांगदेव महाराज समाधी देवस्थानसाठी १ कोटी निधीतून सभामंडप व भाविकांसाठी शौचालय व स्नानगृहाच्या कामाचे भूमिपूजन, पुणतांबा येथे २ कोटी निधीतून पुणतांबा-रामपूरवाडी रस्त्याचे भूमिपूजन,२० लक्ष निधीतुन बाजार पेठेतील प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते,अॅड.मुरलीधर थोरात, मा.जी.प.धनंजय धनवटे,वाकडी ग्रा.सदस्य आण्णासाहेब कोते,न.पा.वाडीच्या सरपंच पल्लवी इल्हे,सदस्य वैशाली धनवटे,धनंजय उगले,मयूर वहाडणे,पुणतांबा ग्रा.प.सदस्य अक्षय सोमवंशी,शाम धनवटे,कांचन पेटकर,मंदा थोरात,भाऊसाहेब आहिरे, सोनाजी पगारे,दीपक वाघ,नंदू गायकवाड, रुपेश गायकवाड,राजेंद्र कुऱ्हाडे,अशोक काळे, सचिन वडणे,जगदीश वडणे,श्याम जगताप, विठ्ठल जाधव,शिवाजी जगताप,अमर भोरकडे, रोहन काळे,रामराव जगताप,मिनिनाथ पाचरणे,मनोज गोरे,अविनाश लोंढे,किरण अभंग,भागवत शेळके,अमोल जाधव,सलीम शेख,बलराम बोंबले,डॉ.प्रदीप उगले,संजय घोडेकर,योगेश घोडेकर,राजेंद्र जगताप,दिनेश जगताप,सागर काळे,प्रथमेश शिंदे,संगम घोरपडे सार्वजनिक बांधकामचे सहाय्यक अभियंता रवींद्र चौधरी,ऋषिकेश राऊत, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सहा.अभियंता अमित चोळके आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे.परिणामस्वरूप मतदार संघाच्या विकासासाठी २९०० कोटी निधी आणला. कोपरगाव मतदार संघाचा विकास करण्यासाठी मतदार संघातील जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडून मिळालेल्या निधीतून समसमान वाटा मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील ११ गावांना दिला आहे.आपण संपूर्ण मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावाचा विकास करणे हि आपली नैतिक जबाबदारी आहे.त्या जबाबदारीची जाणीव ठेवून मतदार संघातील सर्वच गावांना मागील साडे चार वर्षात विकासाच्या प्रवाहात आणले असल्याचा दावा शेवटी केला आहे.